मुंबई : गेल्या काही महिन्यात 'ढिंच्यक पूजा' हे नाव  फारच चर्चेत आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्युबवर तिच्या व्हिडिओचा धुमाकूळ होता. विचित्र आवाजात गाण्याचा प्रयत्न करणार्‍या या 'ढिंच्यक पूजा'ने तिला कोणामुळे गाण्याची प्रेरणा मिळाली आहे याचा नुकताच  खुलासा केला आहे.


मूळची दिल्लीच्या असणार्‍या या 'ढिंच्यक पूजा'ला परदेशी गायकांची गाणी आवडतात. पूजा तिची तुलना जस्टिन बीबर, कान्ये वेस्ट, सेलेना गोमेज, लेडी गागा आणि रिहाना यासारख्या आंतरराष्ट्रीय गायकांशी करते. पण जगाला त्याच्या खास शैलीचं आणि मून वॉकचं वेड लावणार्‍या मायकल जॅक्सनकडून पूजाला गाण्याची प्रेरणा मिळाली आहे असे तिने एका खास मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 


वयाच्या १३ व्या वर्षी पूजा मायाकल जॅक्सनला भेटली होती. असा दावादेखील तिने या मुलाखतीमध्ये केला आहे. मायाकलच्या आशिर्वादानेच तिने गायनाला सुरूवात केली आहे. 'ढिंच्यक पूजा'च्या युट्युबवरील व्हिडिओला  सुमारे  ३ कोटी व्ह्यूज्स मिळाले होते. मात्र काही दिवसातच तिचे व्हिडिओ युट्युबवरून हटवण्यात आले आहेत.