मुंबई : झगमगत्या विश्वातील आकर्षण प्रत्येकाला असतं, कोणत्या सेलिब्रिटीच्या आयु्ष्यात छोटी घटना घडली तरी, त्याची चर्चा अनेक दिवस रंगते. सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती इ. गोष्टी कायम चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. ही अभिनेत्री सध्या पाकिस्तानमध्ये जीवन जगत आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तर होतीच, पण चार लग्न गेल्यामुळे प्रसिद्धी झोतात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक दोन नव्हे तर, चक्क चार लग्न करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून  झेबा बख्तियार (Zeba Bakhtiar) आहे. झेबाने 'हिना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1991 साली प्रदर्शित झालेल्या आणि रणधीर कपूर दिग्दर्शित 'हिना' सिनेमानंतर अभिनेत्राच्या लोकप्रियतेत वाढ झाली. 


झेबाचे वडील पाकिस्तानचे मोठे राजकारणी (politicians of Pakistan) होते, तर अभिनेत्रीची आई हंगरीची होती. झेबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचे पहिलं लग्न पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सलमान वल्ल्यानी नावाच्या व्यक्तीशी झालं. मात्र त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. अखेर त्यांचा घटस्फोट झाला. 



यानंतर झेबाने अभिनेता जावेद जाफरीसोबत (Javed Jaffrey) दुसरं लग्न केलं. हे लग्न खूप चर्चेत राहिलं. पण इथेही झेबाच्या नशिबी वेगळेच लिहिलं होतं. पुढे झेबा आणि जावेद जाफरीचा देखील घटस्फोट झाला. 


पुढे झेबाने तिसरं लग्न अदनान सामीसोबत (Adnan Sami) केलं. अदनान सामी आणि झेबा यांना एक मुलगा अजान सामी देखील आहे. पण अदनान सामीसोबत देखील झेबाचं नातं टिकू शकलं नाही. अखेर दोघे विभक्त झाले. 


अदनान सामी सोबत घटस्फोट झाल्यानंतर झेबाने चैथं लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झेबाने सोहेल खान नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केले आहे आणि ती सध्या पाकिस्तानमध्ये राहते. (zeba bakhtiar married four times)