झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या पुरस्कारांची यादी
झी मराठी अवॉर्ड 2018 हा सोहळा रविवारी सायंकाळी 7 वाजता पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या `तुला पाहते रे` या मालिकेला 9 पुरस्कार मिळाले तर `माझ्या नवऱ्याची बायको` या मालिकेला 5 पुरस्कार मिळाले.
मुंबई : झी मराठी अवॉर्ड 2018 हा सोहळा रविवारी सायंकाळी 7 वाजता पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या "तुला पाहते रे' या मालिकेला 9 पुरस्कार मिळाले तर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला 5 पुरस्कार मिळाले.
झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला आणि त्याचसोबत प्रेक्षकांनी भरभरून मत दिलेले त्यांचे लाडके कलाकार विजयी ठरले.
ही आहेत झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या विजेत्यांची नावे
सर्वोत्कृष्ट मालिका - तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट नायिका - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट नायक - विक्रांत सरंजामे (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट जोडी - राणा-अंजली (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) - ईशाचे वडील (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) - बरकत (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) - रेवती (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट भावंडं - राणा-सुरज (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट सून - अंजली (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट सासू - राधिकाची सासू (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट सासरे - राधिकाचे सासरे (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा - राहुल्या (लगीरं झालं जी)
सर्वोत्कृष्ट आई - ईशाची आई (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट वडील - ईशाचे बाबा (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट कुटुंब - निमकर कुटुंब (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक - संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये)
सर्वोत्कृष्ट खलनायिका - नंदिता (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट खलनायक - हर्षवर्धन (लगीरं झालं जी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - लाडू (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - तुला पाहते रे
याच सोबत या सोहळ्यात झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांना श्रवणीय आणि अजरामर शीर्षकगीतं देणाऱ्या संगीतकार अशोक पत्की यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.