zee marathi new serial:झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळे कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणते. त्यामुळे नव्या मालिकांच्या प्रोमोंना प्रेक्षकांनी चांगलीचं पसंती दिली आहे. या मालिकांचे विषय सुद्धा भन्नाट असल्याचं प्रोमोमधून दिसून येतयं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोरंजन विश्वात  टीआरपी हा खुप कळीचा मुद्दा आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवनवीन प्रयोग करताना दिसतात. कथानक चांगले असुनही कमी टीआरपीमुळे अनेक मालिकांना निरोप घ्यावा लागतो. झी मराठीवरील  लोकप्रिय मालिका 'नवा गडी नवं राज्य 'आणि '36 गुणी जोडी' या दोन मालिकांनीसुद्धा  नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 


काही दिवसांपुर्वी झी मराठीवर सुरु झालेला जाऊ बाई गावात हा रिअ‍ॅलिटी शो महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे. या  रिअ‍ॅलिटी शोनंतर झी मराठीवर ‘ड्रामा Juniors’आता पोरांचा ड्रामाच करणार कारनामा... ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानंतर
नुकताच दोन नव्या मालिका सुरु होणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी होतायत लवकरच सुरू...


येतायत भेटायला तुम्हाला शिवा आणि पारू!
अभिनेत्री शरयू सोनावणे ही पारू या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर अभिनेत्री पुर्वी फडके ही शिवा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. नुकताच या  मालिकांचा प्रोमो समोर आला असून चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद या प्रोमोला मिळत आहे.  


या मालिकेच्या प्रोमोनंतर झी मराठीने  आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.'जगद्धात्री' ती साऱ्यांची रक्षणकर्ती, ती 'जगद्धात्री'..!!लवकरच.... असं म्हणत झी मराठीने प्रेक्षकांसाठी मेजवानी आणली आहे.