मुंबई : झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. Mrs.मुख्यमंत्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राईम टाईम मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या झी मराठी वाहिनीने आता आणखी एक खास मालिका आणली आहे. हक्काचं मनोरंजनाचं व्यासपीठ असलेल्या झी मराठीवर आतापर्यंत प्रेक्षकांनी नेहमीच भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे Mrs.मुख्यमंत्री या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा वाहिनीकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही मालिका संध्याकाळी ७ किंवा ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.