झी मराठीवर नवी मालिका `येऊ कशी तशी मी नांदायला`
झी मराठीवरील नवी मालिका `येऊ कशी तशी मी नांदायला` लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मिश्कील
मुंबई : झी मराठीवरील नवी मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मिश्कील सासू अन् खट्याळ सून अशी सासू सूनेची जोडी या मालिकेत पहायला मिळतेय. सासू-सुनेचं खास मैत्रीचं नातं यात पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूची .. नात्यानं या दोघी सासू -सुना आहेत. पण मनात मात्र, त्यांच्या मैत्रीच्या धाग्याची विण घट्ट बांधली गेली आहे.
अलिकडेच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोमुळे अनेकांना या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले, अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर अदिती सारंगधर, दिप्ती केतकरदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.