मुंबई : गेली २ दशकं मराठी मनोरंजनाच्या दुनियेत सातत्याने नवनवीन कार्यक्रम देणारी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी, महाराष्ट्राची महावाहिनी आपली लाडकी 'झी मराठी' आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच दर्जेदार कार्यक्रम देत आली. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या घरात हवीहवीशी वाटणारी झी मराठी असे प्रयोग करताना मराठी मातीची आणि महाराष्ट्राची परंपरा नेहमीच जपली आहे. म्हणूनच कि काय आज महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतातील आणि देशविदेशातील प्रेक्षक झी मराठीवर भरभरून प्रेम करतो आणि हक्काने सूचनाही करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांसोबतचे हे ऋणानुबंध जपत, ह्या कठीण काळात सुद्धा मनोरंजन करण्याचं वचन ‘झी मराठी’ आपल्या प्रेक्षकांना देत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. अशावेळी लॉकडाऊनमध्ये घरात असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सज्ज आहे.(मनोरंजन थांबलं नाही, थांबणार नाही!.... झी मराठी ठरलं अव्वल.. मिम्स व्हायरल) 


 



सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरु आहेत, ह्या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी तुमच्या सोबत असणार आहे. कारण आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत.  सोशल मीडियावर देखील याचे मिम्स व्हायरल होत आहेत.


या परिस्थितीत देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे. झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी होणार आहे.


झी मराठीवरील कोणत्या मालिकांचे चित्रीकरण कुठे होणार पाहूया!


होम मिनिस्टर - घरच्या घरी


पाहिले न मी तुला - गोवा


येऊ कशी तशी मी नांदायला - दमण


अग्गबाई सुनबाई - गोवा


माझा होशील ना - सिल्वासा


चला हवा येऊ द्या - जयपूर


देवमाणूस - बेळगाव


तसेच वेध भविष्याचा माध्यमातून भगरे गुरुजी रोज सकाळी आपल्या भेटीस येणारच आहेत सोबत रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे नवे भाग देखील तयार आहेत.  


त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकांचे ओरिजिनल भाग आपल्याला पाहता येणार आहेत हे नक्की, कारण ओरिजिनल म्हणजे फक्त झी मराठी.