झी टॉकीजवर `मन मंदिरा - गजर भक्तीचा`
गजर भक्तीचा...
मुंबई : मराठी संस्कृती आणि मूल्य झी टॉकीजनी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच त्यांच्या सादरीकरणातून जपली आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'मन मंदिरा - गजर भक्तीचा' म्हणजे भक्तजन आणि प्रेक्षक यांच्यासाठी भक्तिमय कीर्तनाची पर्वणीच. आषाढी एकादशीचे औचित्य साधून झी टॉकीजनी या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
२५ जून ते २३ जुलै या काळात निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), बाबा महाराज सातारकर, रामरावजी ढोक महाराज, जयवंत महाराजबोधले, बाबासाहेब महाराज इंगळे, केशव महाराज उखळीकर, अमृत जोशी महाराज, लहिवतकर महाराज, उद्धव महाराज मंडलिक, धोंडगे महाराज, तुकाराम मुंडे महाराज हे कीर्तनकार कीर्तन करणार आहेत. ठिकठिकाणीज्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत, असे काही दिग्गज कीर्तनकार या मालिकेतून प्रथमच टेलिव्हिजनवर कीर्तन करणार आहेत.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता त्यांच्या कीर्तनाचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमाचेसूत्रसंचालन जय मल्हार फेम पूर्वा नीलिमा सुभाष करणार आहे. 'मन मंदिरा - गजर भक्तीचा' हा खास कार्यक्रम रोज सायंकाळी ६ वा. प्रसारित होणार आहे. तेव्हा भक्तिमय कीर्तनात तल्लीन होण्यासाठी पाहायला विसरू नका 'मन मंदिरा - गजर भक्तीचा', २५ जून ते २३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता फक्त झी टॉकीजवर