मुंबई : एकच राजे… शिव छत्रपती माझे" हे वाक्य सम्पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर सम्पूर्ण जगात अतिशय मानाने घेतले जाते. शिव छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ऐसा राजा पुनः होणे नाही. याच आपल्या देवाला मानवंदना देण्यासाठी झी टॉकीज ने एका खास सांगीतिक मैफिली चे प्रयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराजांवर आधारित फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या मेकिंगच्या काही अविस्मरणीय आठवणींना सुद्धा उजाळा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराजांना ही विशेष आदरांजली अर्पण केली जाईल. छत्रपति शिवाजी महाराजांवर आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत मात्र 'एकच राजे.. शिव छत्रपती माझे ‘हा कार्यक्रम महाराजांच्या मावळ्यांना वेगळीच स्फूर्ति देईल. या सांगीतिक मैफिली मध्ये पोवाडा, नृत्य, वादन अश्या विविध कला सादर केल्या जाणार आहेत. लता मंगेशकर, अजय अतुल, आदर्श शिंदे, उषा मंगेशकर आणि कुणाल गांजावाला यांच्यासारख्या नामांकित गायकांचे गायन होणार आहे.



या व्यतिरिक्त, सिद्धार्थ जाधव, वैभव तत्त्ववादी, वैदेही परशुरामी या लोकप्रिय कलाकारांचा बहारदार नृत्याविष्कार सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पोवाड्यांची झलक झी टॉकीज च्या प्रेक्षकांना मिळणार आहे. नंदेश उमप आणि शाहीर देवानंद माळी आपल्या खास शैलीत पोवाडा सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसंच या कार्यक्रमाच्या मध्ये प्रेक्षकांना फत्तेशिकस्तच्या कलाकारांकडून शूटिंग दरम्यानचे काही किस्से आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून महाराजांच्या इतिहासातील काही घटना ऐकायला मिळतील.


फत्तेशिकस्त हा चित्रपट कसा घडला आणि त्यासाठी कलाकारांनी केलेली मेहनत देखील प्रेक्षक पाहू शकतील. तेव्हा पहायला विसरु नका ९ ऑगस्ट राजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ' एकच राजे .. शिव छत्रपती माझे ‘आणि फत्तेशिकस्तचे मेकिंग फ़क्त झी टॉकीज वर !