ZEE Yuva : तरूणाई म्हणजे फक्त मुक्तछंदपणे आयुष्य जगणारी, समाजभान नसलेली पिढी या विचाराला छेद देत आज अनेक तरूण विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय काम करत आहेत. अशाच कृतीशील तरूणाईचे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी झी युवा तर्फे  झी युवा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येते. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे यंदाचे झी युवा सन्मान  पुरस्कार 2023 जाहीर झाले असून यामध्ये विविध 12 क्षेत्रातील तरूणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा मंगळवार 14 मार्च 2023 रोजी मुंबईतील विलेपार्लेच्या मुकेश पटेल सभागृहात सायंकाळी 6 वाजता रंगणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी 12,13 आणि 14 मार्च रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सोहळ्याच्या मर्यादित प्रवेशिका पुढील पत्त्यावर उपलब्ध राहतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य पत्ता : मुकेश पटेल सभागृह, नवयुग सोसायटी, नवपाडा, जे. व्ही. पी. डी. स्कीम, विले पार्ले (पश्चिम) मुंबई - 400 047. 


हा कार्यक्रम गुडी पाडव्या  निमित्त 22 मार्च रोज झी युवावर  प्रदर्शित होणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी युवा वाहिनी नेहमीच प्रत्येकाच्या कामाचे कौतुक करण्यासाठी पुढाकार घेत असते. समाजाचे भविष्य घडवणारी तरूणाई हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. नवं काहीतर करून दाखवणारी, नव्या संकल्पनांना मूर्त रूप देणारी तरूणाई समाजासमोर आणून त्यांच्या शिरपेचात पुरस्काराचा तुरा रोवणाऱ्या झी युवा सन्मान पुरस्काराकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. यावर्षीच्या झी युवा सन्मान पुरस्काराची प्रतीक्षा संपली असून लवकरच हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्यासह माझा व डेरीमिल्क यांचे या सोहळयाला सहकार्य मिळाले आहे. 


हेही वाचा : ऑस्कर पुरस्कार जिंकताच सर्वात मागे बसलेल्या RRR च्या टीमची अशी होती रिअ‍ॅक्शन; पाहा Video


समाजातील विविध क्षेत्रातील 12 विभागातील कर्तृत्ववान तरूणाईची निवड या झी युवा सन्मान 2023 या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्यात झी युवा संगीत सन्मान, झी युवा बळीराजा सन्मान,  झी युवा सामाजिक जाणीव सन्मान, झी युवा तेजस्वी चेहरा, झी युवा कला सन्मान, झी युवा क्रीडा सन्मान ,झी युवा साहित्य सन्मान ,झी युवा विज्ञान आणि तंत्रज्ञान सन्मान, झी युवा नेतृत्व सन्मान , झी युवा शैक्षणिक कार्य सन्मान , झी युवा संजीवनी सन्मान असे पुरस्कार आहेत