मुंबई : योग्यवेळी आपला जोडीदार निवडून त्याच्यासोबत सुखाचा संसार करणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि आपल्या त्याच जोडीदाराची साथ आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळणं, ही सगळ्यांची इच्छा असते. काही लोक मात्र याला अपवाद ठरतात. मुलाबाळांचं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकमेकांसाठी उरलेले "ते दोघे" जर वेगळे झाले तर सगळ्यात जास्त मानसिक आणि भौतिक त्रास हा स्त्रीला सहन करावा लागतो.


आयुष्याच्या उतरणीला रेवतीही (वर्षा उसगावकर) अचानक अशीच एकटी झाली. आपल्या संसाराचा दुसरा अंक नव्या उमेदीने जगण्याची स्वप्न पाहणाऱ्या रेवतीचा जोडीदार तिला जन्मभर साथ देण्याचं वचन देऊनही अर्धवट वाटेत सोडून गेला. मुलं विदेशात स्थायिक होऊन त्यांच्या त्यांच्या संसारात रमलेली.. एकट्या स्त्रीचं आयुष्य सोपं नसल्याचा अनुभव आता ती पावलोपावली घेत आहे. तिची एकटीची होणारी घालमेल न पाहवून तिची बहीण तिला तिचं नाव एका मॅट्रिमोनियल साईटवर नोंदवायला सांगते.


तिचा या वयात घेतलेला निर्णय तिच्या मुलांना रुचेल का? या संभ्रमात रेवती असतानाच तिला सुधीर राजवाडे यांचं स्थळ येतं. सुधीर आणि रेवती परस्परांच्या भावना समजून एकमेकांचा स्विकार करतील का? त्यांच्या या निर्णयावर त्यांच्या मुलांची काय प्रतिक्रिया असेल? सुधीर आणि रेवतीच्या मनाचे बंध जुळतील का? मनाने एकाकी होत चाललेल्या "त्या दोघांची" ही भावनिक गोष्ट पाहायला विसरू नका, झी युवावरील गुलमोहोर या कथामालिकेतील "मोगरा फुलला" या नवीन कथानकामध्ये दि. २६ व २७ मार्च २०१८ रोजी रात्री ९:३० मी. फक्त आपल्या लाडक्या झी युवावर..