मुंबई : शाहरूख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा 'झिरो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने अगदी जोरदार ओपनिंग केली आहे. पण या सिनेमाने अद्याप कोणताच रेकॉर्ड बनवलेला नाही. पण अजूनही या सिनेमाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाची गोष्ट ही आहे की, शाहरूख खानचा Zero हा सिनेमा रजनीकांत यांच्या 2.0 या सिनेमाला मागे टाकू शकलेला नाही. त्यामुळे अजूनही 2.0 सिनेमा सगळ्या सिनेमांना टक्कर देत असल्याचं समजत आहे. 


Zero सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 20 करोड रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी तरी या सिनेमाने काही करिश्मा केलेला नाही. पण चांगली कमाई केली आहे. 



शाहरूखच्या झिरोची रेकॉर्ड तोड ओपनिंची आशा केली होती. पहिल्या दिवशी अशी अपेक्षा होती. पण तसा रिव्ह्यू हाती आलेला नाही. 



झिरोमधील शाहरूख खानचा अभिनय प्रेक्षकांनी पसंत केला आहे. पण सिनेमाची गोष्ट आणि दिग्दर्शन तेवढं चांगल नसल्याचं म्हटलं जात आहे. 


शाहरूखच्या आणि चाहत्यांच्या झिरो या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. हा सिनेमा सुपरहिट ठरेल अशी चाहत्यांना आशा होती. पण तसं काही घडलं नाही. आणि या सिनेमावर शाहरूखच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. 


'झिरो' हा सिनेमा भारतात जवळपास 4,400 स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. तर विदेशात हा सिनेमा जवळपास 1,500 स्क्रीन्सवर दाखवण्यात आला आहे. 


झिरोकरता पहिला आठवडा सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या सिनेमाचं बजेट 200 करोड रुपये असून या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला हा सिनेमा बिग बजेट सिनेमा आहे.