ऋतिक रोशन-कतरिना कैफच्या जाहिरातीवर हंगामा, Zomato ला द्यावं लागलं स्पष्टीकरण
Zomato ला युझर्सने विचारले प्रश्न
मुंबई : फूड डिलीवरी एग्रीगेटर झोमॅटो (Zomato) ने देशातील फूड डिलीवरी आणि डायनिंग सिस्टममध्ये खूप मोठा बदल केला. झोमॅटोची नवी जाहिरात सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. यामध्ये अभिनेता ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ आहे. ज्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं आहे. आता यावर झोमॅटोने प्रतिक्रिया दिली आहे.
युझर्सचा आरोप आहे की, डिलिवरी पार्टनरसोबत खराब व्यवहार केला. झोमॅटोने म्हटलं आहे की,जाहिरातीमागे कंपनीचा विचार हा डिलीवरी पार्टनरला हिरो बनवणं असा होता.
जाहिरातीमधून द्यायचा होता हा मॅसेज
जाहिरातीमध्ये डिलीवरी पार्टनर ऋतिक रोशनच्या घरी डोअरबेल वाजवतो. तो ऋतिकचं पार्सल देतो. यानंतर अभिनेता ऋतिक त्याला वाट बघायला सांगतो कारण त्याला सेल्फी घ्यायचा असतो. ऋतिक घरी जातो आणि मोबाइल फोन घेऊन येतो. पण तेवढ्यातच डिलिवरी पार्टनर आणखी एक ऑर्डर येते. आणि तो निघून जातो. जाहिरातीतून असा मॅसेज दिला जातो की, ऋतिक रोशन असो वा तुम्ही, आमच्यासाठी ग्राहकच स्टार आहे.
कतरिना कैफच्या जाहिरातीमध्ये देखील असंच आहे. कतरिना डिलीवरी पार्टनरला केक खाण्यासाठी सांगते. आणि जात आहे. यानंतर डिलिवरी पार्टनरच्या मोबाइलवर पुढच्या डिलिवरीकरता नोटिफिकेशन येतं. आणि तो ते पुढे द्यायला जातो. सोशल मीडियावर या दोन्ही जाहिरातींना विरोध झाला आहे. या दोन्ही जाहिरातींना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात आलं.
सोशल मीडिया युझर्सने डिलिवरी पार्टनरला कमी पगार देतात. झोमॅटोवर अनेक प्रश्न उभे केले आहेत. युझर्स असं देखील म्हणत होते की, डिलिवरी पार्टनरकडे स्वतःकरता वेळ नसतो. त्यावर पार्सलला वेळेत पोहोचवण याचा दबाव त्यांच्यावर असतो. जो दबाव चुकीचा आहे.
सोशल मीडियावर यावरून खूप मोठी चर्चा सुरू आहे. झोमॅटोला खूप मोठं स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.