मुंबई : गुगलने डूडल बनवून 'कथ्थक क्वीन' सितारा देवींना वाहिली श्रद्धांजली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (बुधवार) ८ ऑक्टोबर. कथ्थक क्षेत्रातील मान्यवरांसाठी आणि कथ्थक चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण दिवस. गुगललाही आजच्या दिवसाचे महत्त्व पक्के माहित आहे. म्हणून, डूडल बनवून गुगलने आजचा दिवस साजरा केला. जणून डूडल मधल्या व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ तो सर्वार्थाने सन्मान ठरावा.


आजचे गुगलचे डूडल आधारीत आहे 'कथ्थक क्वीन' सितारा देवी यांच्यावर. ८ नोव्हेंबर हा सितारा देवी यांचा जन्मदिन. सितारा देवी यांचे डूडल बनवून गुगलने सन्मान करावा ही भारतीय कला क्षेत्रासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे. कारण, भारतीय कला, संस्कृती क्षेत्राचा झालेला हा मोठा सन्मान आहे. सितारा देवी आज हायात असत्या तर, त्यांनी आपला ९७वा वाढदिवस साजरा केला असता.


कथ्थक आणि सितारा देवी समीकरण


आज जरी आपल्याला कथ्थक हे नाव उच्चारले तरी, सितारा देवींचे नाव पुढे येत असले तरी, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम आणि कठोर साधना केली होती. अवघ्या १६व्या वर्षी त्यांनी कथ्थकवर मिळवलेले प्रभूत्व पाहून गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी त्याला 'कथ्थक क्वीन' ही उपाधी दिली. 


पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत


कला आणि नृत्य क्षेत्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्धल सितारा देवी यांना १९७०मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. १९९४ मध्ये त्यांना 'कालिदास सन्मान' मिळाला. सितारा देविंचे कथ्थक नृत्य पाहून बॉलिवूडनेही त्यांच्यासमोर नतमस्तक होणे पसंत केले. म्हणूनच अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना सितारा देविंकडून कथ्थकचे धडे मिळाले. जे त्यांना चित्रपटनृत्यात फायदेशीर ठरले. अभिनेत्री रेखा, मधुबाला, माला सिन्हा, काजोल यांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी सितारा देवींकडून कथ्थकचे धडे घेतले.


जन्म आणि मृत्यू


सितार देवींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२०मध्ये कोलकाता येथे झाला. पण सितारा देविंचा संघर्ष जन्मापासूनच सुरू झाला. त्यांच्या आई वडीलांनी त्यांना मोलकरणीला दिले होते. कारण, सितारा देवींचा चेहरा काहीसात वाकडा होता. पण, मोलकरणीने त्यावर अनेक परिश्रम करून त्यांचा चेहरा ठिक केला आणि त्यांना पुन्हा आई-वडीलांकडे पाठवले. सितारा देविंचा जन्म धनतेरस या दिवशी झाला म्हणून त्यांना 'धन्नो' नावानेही बोलवले जाई. २५ नोव्हेंबर २०१४ मध्ये मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला.