Food To Avoid With Tea: भारतीयांसाठी चहा हे एक एनर्जी ड्रिंक आहे. डोकं दुखण्यापासून ते झोप घालवण्यासाठीही लोक चहा पितात. काही जणांना तर झोपेतून उठल्याउठल्या चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. मात्र, सकाळी नाश्ता म्हणून अनेकजण चहा बिस्किट खातात. पोटभरण्यासाठी चहा बिस्किट हा पर्याय वापरतात. पण हा सर्वोत्तम पर्याय नाहीये. चहासोबत बिस्किट खाल्ल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, चहासोबक बिस्किट खाल्ल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. इतकंच नव्हे तर यामुळं आपला डीएनएलादेखील धोका पोहोचू शकतो. त्यामुळं चहासोबत बिस्किटएवजी काय खावे? याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. तरुणांमध्ये हार्ट अ‍ॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. चहा बिस्किटचे सेवन केल्यास त्याचा धोका अधिक वाढू शकतो. बिस्किटमध्ये सोडियम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळं रक्तदाब वाढतो. हे एक हार्ट अॅटेक आणि हृदय विकाराच्या वाढत्या समस्यांचे कारण आहे. 


मैदा आणि रिफाइंड शुगर वापरुन बिस्किट तयार केले जाते. ज्यातील इन्सुलिन हार्मोन्स असंतुलित करते आणि त्यामुळं मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तर, मैद्यामुळं पचनसंस्था बिघडू शकते. ज्यामुळंबद्धकोष्टतासारख्या आजार मागे लागू शकतात. बिस्किट हाय प्रोसेस्ड फूड असून त्यामध्ये डीएनए डॅमेज करणारे बीएचए आणि बीएचटी असतात. यामध्ये हायड्रोजेनेटेड व्हेजिटेबल ऑइल असते ज्यामुळं शरीरातील हार्मोनमध्ये बिघाड होऊ शकतो. 


चहासोबत काय खावं


चहासोबत भाजलेले चणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. चण्यांमध्ये इन्सुलिन रेग्युलेट करण्याची क्षमता असते. ज्यामुळं ब्लड शुगर नियंत्रित राखण्यास मदत होते. तसंच, यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे बी-कॉम्पलॅक्सदेखील असतात. पाचनक्षमता वाढवणारे फायबरदेखील चण्यात आढळतात. हाडांना मजबूती देण्यासाठी कॅल्शियम, मॅग्निशियम असतात. सूज कमी करणारे कोलीनची मात्राही चण्यात असते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)