How To Lose Weight :  28 वर्षीय सार्थक अनेजा या तरूणाने तब्बल 133 किलोपर्यंतचा आकडा वजनकाट्यावर गाठला होता. लठ्ठपणामुळे अनेकदा त्याला सुसती आणि आळस असायचा. एवढंच नव्हे तर तो कायम थोडसं काम करूनही थकायचा. वजन जास्त असल्यामुळे कपडे कोणतेच नीट होत नव्हते अनेकदा लाजीरवाण्या प्रसंगांना सार्थक सामोरे जात होता. एका पार्टीतल्या स्वतःच्या फोटोला बघून तो खूप नकारात्मक झाला आणि तेव्हाच त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. 


जीवनशैलीत केला बदल 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    इंटरमिटेंट फास्टिंग

  • हाय प्रोटीन डाएट

  • क्रेविंगवर कंट्रोल मिळवणे

  • आहाराचा पोर्शन कंट्रोल करणे 


असा होता डाएट प्लान 


  • सकाळच्या नाश्तामध्ये आवळा कोरफडीचा रस, 4 बदाम, 4 मनुके, 2 अक्रोड, 1 स्कूप प्रोटीन शेक असा आहार असायचा. 

  • सार्थक दुपारच्या जेवणात ताक किंवा टरबूज रसासोबत चिकन कोशिंबीर

  • रात्रीच्या जेवणात ऑम्लेट/उकडलेले अंडी खायचा. एवढंच नव्हे तर संध्याकाळी 6.30 नंतर सार्थक काहीच खात नसे.

  • व्यायामापूर्वीचे जेवण डाएटमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. फास्टिंगमध्ये जास्त कॅलरी बर्न करण्यासाठी उपाशीपोटी वर्कआऊट करत असे. 


सार्थकने स्वतः शेअर केला व्हिडीओ



चिट डे असा असायचा 


सार्थक चिट डे करताना आपल्या आवडीचे पदार्थ खात असे. बटर चिकन, पिझ्झा, मोमो ,चीझकेक यासारखे पदार्थ खात असे. तसेच या दिवसांतही तो 200 ग्रॅम चिकन ब्रेस्ट सॅलड, ड्रेसिंग म्हणून कमी चरबीयुक्त सॉस वापरणे यासारखे पर्याय निवडत असे. 
वजन कमी करण्यासाठी तो इंटरमिटेंट फास्टिंगही करत असे. 


वर्कआऊट रुटीन 


1 तास कार्डिओ आणि 1 तास वेट ट्रेनिंग असा सार्थकचा वर्कआऊट रुटीन असे. तसेच आठवड्याच्या शेवटी तो बॅडमिंटन खेळत असे. मी नियमितपणे जेव्हा मी वर्कआउट करायला सुरुवात केली तेव्हाचे फोटो पाहतो तेव्हा मला पुन्हा असं व्हायचं नाही असं मनापासून वाटतं, असं सार्थक सांगतो.  वजन कमी करण्यासाठी सतत मेहनत करणे आवश्यक आहे. एका वर्षात काय साध्य करता येईल असा प्रश्न अनेकांना पडतो पण वजन कमी करण्यासाठी सातत्य अतिशय महत्त्वाचं ठरते. 


प्रत्येकाचा प्रवास वेगळा 


वजन कमी करताना प्रत्येकाचा डाएट वेगळा असतो तसा अनुभव देखील वेगळा असतो. त्यामुळे या डाएट प्लानवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. पण आपल्या डाएट न्यूट्रिशनिस्ट व्यक्तीशी बोलून आपला डाएट प्लान ठरवावा. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)