मुंबई : हिवाळ्यात अनेकांना पोट दुखीचा त्रास होतो. तेव्हा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरगुती उपाय म्हणून नाभीत तेल घातले जाते. कालांतराने या सोप्या पद्धतीने बरे देखील वाटते. पण फक्त पोटात दुखल्यावरच नाभीत तेल घालणे पुरेसे नाही. दररोज रात्री झोपताना तुम्ही याचे २ थेंब नाभीत घातल्यावर अनेक समस्यांवर उपाय मिळणार आहे. याचा फायदा तुम्हाला निरंतर  होणार आहे. 


याचा करा वापर? 


रात्री झोपताना नाभी मध्ये (बेंबी मध्ये) गायीचे देशी तूप किंवा कडूलिंबाचे तेल, मोहरीचे तेल, नारळ किंवा बादाम तेल, ओलिव ओईल इत्यादी चे फक्त २ थेंब लावल्यामुळे जे १४ अविश्वसनीय फायदे मिळतात त्या बद्दल माहीती देत आहोत.


त्वचा चांगली आणि सुंदर करण्यासाठी, आपल्या वेदना घालवण्यासाठी, संततीसाठी अनेक उपाय आणि टिप्स वापरल्या जातात.  पण तुम्हाला आश्चर्य होईल की पोटावरच्या नाभी मध्ये तेलाचे काही थेंब लावल्यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकतो. तसेच  तेल लावल्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी, खोकला, नाक वाहने आणि त्वचेशी निगडीत समस्या पासून सुटका मिळतो.


 नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात


१) जर तुम्हाला सांधेदुखी किंवा ओठ फुटल्याची समस्या झाली असेल तर तुम्ही महुरीच्या (राई) तेलाने यापासून सुटका मिळवू शकता यासाठी आपल्या नाभी मध्ये राईच्या तेलाचे काही थेंब टाका. 


२) तुम्हाला सर्दी आणि कफ यांचा त्रास होत असेल तर कापसाचा गोळा अल्कोहल मध्ये बुडवून नाभीवर लावा. हा सर्दी कफ वर अचूक उपाय आहे यामुळे जुनाट सर्दी कफ सुद्धा ठीक होते.


३) मुलींना मासिक पाळीमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या दिवसात अनेक हार्मोनल चेंजेस पण होत असतात ज्यामुळे त्यांचा मूड चांगला राहत नाही आणि आरोग्य सुध्दा. पण जर तुम्ही मासिक पाळीतच्या वेळी होणाऱ्या या समस्यांपासून वाचू इच्छिता तर कापसाचा गोळा ब्रांडी मध्ये भिजवा आणि यास नाभीवर ठेवा. यामुळे तुम्हाला या समस्यां पासून मुक्ती मिळेल.


४) तारुण्याची चाहूल लागताच मुलगा असो की मुलगी सर्वांना मुरुमांची समस्या होते. जर तुम्हाला पण या समस्येने घेरले असेल तर कडुलिंब तेल काही थेंब नाभीत टाकून आजूबाजूला थोडी मसाज करा यामुळे मुरूम आणि फोड्या येणे बंद होऊन त्वचा बेदाग आणि सुंदर होईल.


५) चेहरा डागरहीत किंवा सुंदर असेल तर त्याची गोष्टच वेगळी असे म्हंटले जाते की बादाम तेलाचे काही थेंब नाभी मध्ये लावल्यामुळे चेहरा उजळतो आणि तेज येते.


६) नारळाचे तेल किंवा ओलिव ओईलचे काही थेंब नाभी वर लावावे आणि हळूहळू मसाज करावी. यामुळे संतती निगडीत समस्या दूर होतात आणि संतती क्षमता वाढते.


७) सर्वांना बेबी सॉफ्ट त्वचा पाहिजे असते. तुम्हाला ही निरोगी आणि सॉफ्ट त्वचा पाहिजे आहे का जर होय असे उत्तर असेल तर तुम्हाला फक्त गायीचे तूप नाभीवर लावावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला मिळेल बेबी सॉफ्ट त्वचा.


८) शरीराच्या सर्व बॉडी पार्टसचे कनेक्शन नाभी सोबत जोडलेले असते. नाभी मध्ये दररोज काही थेंब गायीचे तूप लावल्यामुळे अनेक आजारा पासून बचाव होतो. तसेच या नैसर्गिक थेरपीमुळे अनेक हेल्थ प्रोब्लेम ठीक केले जाऊ शकतात. सोबतच हे आपल्याला सुंदर बनवतात.


 नाभीमध्ये गाईचे तूप लावून हलकी मालिश केल्यामुळे होणारे फायदे.


१) तूप नाभीत लावल्यामुळे स्कीन मध्ये आद्रता टिकून राहील आणि फेयरनेस वाढेल.


२) यामुळे स्कीनची ड्रायनेस दूर होते आणि चेहरा चमकदार होतो.


३) यामुळे केसांचे गळणे थांबते आणि केस चमकदार होतात.


४) तसेच हे गुडघेदुखी आणि सांधेदुखी मध्ये फायदेशीर आहे.


५) यामुळे पिम्पल्स आणि डाग दूर होतात.


६) नाभी मध्ये तूप लावल्यामुळे ओठ सुंदर होतात.


७) यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि बुद्धीकोष्ट पासून बचाव होतो