चिंतेत वाढ! दक्षिण आफ्रिकेहून आलेले 4 जणं पॉझिटीव्ह
दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानच्या जयपूरमध्ये परतलेल्या एका कुटुंबातील 4 जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.
मुंबई : कोरोनाची ओमायक्रोन व्हेरिएंटची दोन प्रकरणं कर्नाटकमध्ये नोंदवण्यात आली आहेत यामुळे चिंतेत भर पडली आहे. अशातच दरम्यान, एका आठवड्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानच्या जयपूरमध्ये परतलेल्या एका कुटुंबातील 4 जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. हे कुटुंब 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतले होते, असं सांगितलं जातंय. बाधित कुटुंबाला जयपूरच्या आरयूएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Omicron व्हेरिएंटची पुष्टी नाही
कोविड-19चा नवा प्रकार Omicron या चारही जणांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं अद्याप निश्चित झालेलं नाही आणि त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ओमायक्रोन व्हेरिएंट आहे की, नाही हे जीनोम सिक्वेन्सिंग नंतरच ठरवलं जाईल.
संपर्कात आलेले 5 जणांनाही संसर्ग
या कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना संसर्ग झाल्याचे सांगितले जाते. दक्षिण आफ्रिकेतून जयपूरला परतलेल्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 12 जणांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे.
दुसरीकडे मुंबई विमानतळावर लंडन, जर्मनीहून आलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. 10 नोव्हेंबरपासून आतापर्यंत मुंबई विमानतळावर 485 जणांची टेस्ट झाली. त्यातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार आहे.
कर्नाटकातल्या ओमायनक्रॉनबाधितांच्या संपर्कातील 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. या सर्वांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.