Healty Habits : खरंच वयापेक्षा जास्त तरुण आपण दिसू शकतो का? कारण वय वाढलं तरीही तरुण दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते पण त्यासाठी नेमकं काय करावं हेच कळत नाही. अनेकदा आपल्या जीवनशैलीतील बदल अतिशय महत्त्वाचे आणि पुरक ठरतात. जर एखाद्या व्यक्तीने चांगले खाणे-पिणे, त्वचेची काळजी घेतली आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले, तर त्याचे शरीरही निरोगी वाटेल आणि त्वचा तरुण दिसू लागेल. त्यामुळे काही लोकांची त्वचा त्यांच्या वयापेक्षा लवकर वाढू लागते. तर काही लोकांचे वय त्यांच्या त्वचेवरूनही दिसत नाही. इथेही अशाच काही जीवनशैलीच्या सवयी सांगितल्या जात आहेत ज्याचा अवलंब केल्यास तुम्ही तुमच्या वयापेक्षा 10 नाही तर 14 वर्षांनी लहान दिसू शकता.


जीवनशैलीतील 4 महत्त्वाचे बदल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणी पिणे 
पाणी तर आपण सगळेच पितो पण योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी असे अनेक लोक असतात ज्यांना फक्त तहान लागल्यावरच ते पाणी पितात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी पिणे देखील गरजेचे असते. यामुळे त्वचा ड्राय होत नाही तर अतिशय तजेलदार दिसते. 


ऍक्टिव राहा
शरीर आतून आणि बाहेरुन दोन्ही रुपातून चिरतरुण राहण्यासाठी ऍक्टिव असणे अत्यंत गरजेचे आहे. थोडं वॉक करणे, योगा करणे, एक्सरसाइज करणे यासारख्या चांगल्या सवयी लावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. रिसर्चमध्ये देखील हे पाहण्यात आलंय. हाय इंटेंसिटी वर्कआऊट करुन तुम्ही 10 वर्ष तरुण दिसू शकता. एवढं नव्हे तर हालचाल न केल्यामुळे तुमचं वय वाढलेलं दिसू शकतं. 


फळ खाणे
रोज एक फळ खाण्याची सवय लावली तर शरीरातील निम्म्या समस्या अशाच दूर होतील. फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण बनते. तुम्ही तुमच्या आहारात सफरचंद, संत्री, पेरू, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्मांनी युक्त बेरी आणि पपई इत्यादींचा समावेश करू शकता.


मानसिक आरोग्याची काळजी घ्या
अनेकदा आपण शारीरिक आरोग्याबद्दल बोलतो पण मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. शरीराला आंतरिक आणि बाहेरून निरोगी ठेवण्यासाठी मानसिक आरोग्यही उत्तम राखणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर खाण्याच्या चांगल्या सवयींचाही माणसावर परिणाम होतो, तणाव दूर होतो आणि मन प्रसन्न राहते त्यामुळे शरीरात निरोगी हार्मोन्स बाहेर पडतात.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)