मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी याआधी थ्री डी मध्ये  पवनमुक्तासन, सेतु बन्धासन, शलभासन, अर्ध चक्रासन, वज्रासन, वृक्षासन आणि भुजंगासना योगा आसनांशी संबंधित फायद्यांबद्दल सांगितले होते. 'योगा डे' आधी पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये ते थ्री डी योगा केलाय. हा एक अॅनिमेटेड योगा असून यामध्ये ते अलोम-विलोम करताना दिसत आहेत. 'नाडी शोधन प्राणायाम'वर एक व्हिडिओ शेअर करतोय असे त्यांनी यावर लिहिले आहे. याच्या दरदिवशी अभ्यासाचे खूप फायदे आहेत.



आंतरराष्ट्रीय योगा दिवस



 २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. यावेळी चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिवस असणार आहे. शुद्धीकरण, कफ  आणि हृदयाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांना ते योगाचे फायदे सांगत आहेत. याआधी पंतप्रधानांनी थ्री डी मध्ये शलभासन, अर्ध चक्रासन, वज्रासन, वृक्षासन आणि भुजंगासना योगा बद्दल सांगितले होते.