Weight Loss Tips: वर्क फ्रॉम होम, ऑफिसात बैठे काम यामुळं वजन वाढते. कामाच्या व्यापात जिम किंवा योगा क्लासला जायला वेळ मिळत नाही. अशावेळी सतत वाढत जाणारा लठ्ठपणामुळं इतर आजारही मागे लागतात. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आहारावरही नियंत्रण ठेवावे लागते. बाहेरील पदार्थ टाळावे लागतात. वजन कमी करण्यास आहाराची महत्त्वाची भूमिका असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार जितका महत्त्वाचा असतो त्याचबरोबर व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आहाराचे महत्त्वच उरत नाही, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र, कामाच्या धकाधकीत जिममध्ये जाऊन व्यायाम करायला मिळत नाहीये. काळजी करु नका आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्पे व्यायाम देत आहोत. जेणेकरुन तुम्ही अगदी कमी वेळातही व्यायामही करुन वजन कमी करु शकता. 


दोरीवरच्या उड्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोरीवरच्या उड्या हा व्यायाम प्रकार तर तुम्हाला माहितीच असेल. लहान असताना मित्र-मैत्रिणींसोबत हा खेळ तुम्ही खेळला असालच. कॅलरी बर्न करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. दोरीवरच्या उडी मारल्याने दर मिनिटाला १३ कॅलरीज बर्न होतात. तसंच, हृदयासाठीही हा व्यायाम प्रकार फायदेशीर आहे. व्यायामाची सुरुवात करताना काही दिवस एक मिनिटे दोरीवरच्या उड्या मारा. नंतर शरीराला सवय झाल्यानंतर वेळ वाढवा. नंतर एका पायावर उडी मारण्याचा प्रयत्न करा, या दरम्यान पाय अधे-मध्ये बदलत राहा. 


रनिंग


जीममध्ये गेल्यावर कार्डिओ असते. कार्डिओ केल्याने हार्ट रेट स्थिर राहतो. मात्र, जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही सकाळी रनिंगचा पर्यायही वापरू शकता. रनिंगहा कार्डिओला उत्तम पर्याय आहे. रनिंग केल्याने दर मिनिटाला तुम्ही साधारणपणे १० कॅलेरीज जाळू शकता. रोज साधारण अर्धा तासापर्यंत धावणे गरजेचे आहे. धावत असताना घाम अधिक येतो. अशावेळी थोड्या थोड्यावेळाने पाणी पित राहा. स्वतःला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. सुरुवातीला वेळ आणि वेग थोडा कमी ठेवा. नंतर सवय झाल्यानंतर हळूहळू वेग आणि वेळ दोन्ही वाढवा. 


पोहणे


तुम्हाला स्विमिंगची आवड असेल तर ही आवड तुम्ही फिट ठेवण्यासाठी वापरु शकता. स्विमिंग केल्याने तुम्ही दर मिनिटाला १० कॅलरीज बर्न करु शकता. पोहण्यामुळं शरिरीच्या स्नायूंचा जास्त वापर होतो आणि मेहनतही अधिक लागते. त्यामुळं कॅलरीज अधिक बर्न होतात. 


सायकलिंग


तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अर्धा तास सायकलिंग करु शकता. सायकल चालवल्याने तुमच्या शरिराच्या सर्व स्नायूंचा व्यायाम होतो. पायाची ताकदही वाढते. नियमित सायकल चालवल्याने वजन झपाट्याने कमी होते. प्रतिदिन १२ कॅलरीज तुम्ही सायकल चालवून बर्न करु शकतात. 


पुश अप


पुश अपदेखील तुम्ही घरच्या घरी मारु शकता. पुश अपमुळं लठ्ठपणा कमी होतो. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्नायूंना बळकटी निर्माण होते. सुरुवातीला पाच मिनिटांपर्यंत तुम्ही पूश अप मारु शकता. नंतर हळहळू वेळ वाढवत न्या.