मुंबई : तुमच्या आयुष्यात प्रेमाची आणि हक्काची व्यक्ती मिळणं हा आयुष्यातला उत्तम क्षण असतो. प्रेमाची भावनादेखील तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलून जातात. प्रेमात पडल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक लहान सहान गोष्टींमध्ये बदल झालेले दिसतात. मग हे बदल  होणं अगदीच स्वाभाविक आहेत... 'क्रश'ला समोर पाहून मुलींकडून हमखास होतात 'या' चूका


झोप कमी होणं -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमात पडल्यानंतर लोकांची झोप उडते हे तुम्हांला ठाऊक असेलच. प्रामुख्याने मुली प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या झोपेचं प्रमाण कमी होते. रात्रभर फोनवर बोलणं, चॅटिंग करणं अशा सवयी सुरू होतात. 


गाण्याची आवड - 


प्रेमात पडल्यानंतर मुली लव्हस्टोरी, रोमॅन्टिक गाणी सोबत स्वतःचं कनेक्शन लावायला सुरूवात करतात. प्रेमात पडण्यापूर्वी लव्हस्टोरीजवर विश्वास न ठेवणार्‍यांमध्येही असे बदल दिसून येतात. 


बॉडी लॅग्वेज बदलते- 


प्रेमात पडल्यानंतर मुली स्वतःकडे अधिक लक्ष देतात. त्या अधिक प्रेंझेन्टेबल राहण्याकडे त्यांचा कल असतो. कपड्यांमध्ये, चालण्या, बोलण्यामध्येही बदल झालेले असतात. एकूणच मुलींची पर्सनॅलिटी बदलते. या '४' अक्षरांवरुन नाव सुरु होणाऱ्या मुली असतात अत्यंत नखरेबाज!


मोबाईलमध्ये अधिक वेळ - 


एरवी मुलींना मोबाईल केवळ कॉल घेण्यासाठी  वापरायची सवय असायची त्या हळूहळू मोबाईलमध्येच खूपवेळ गुंतलेल्या दिसतात. सतत त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये असते. तो इतरांसोबत शेअर करणंदेखील त्यांना पसंत नसते. या ५ इशाऱ्यांवरुन जाणा समोरची व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे!


लाजणं - 


मुलींना आरशात पाहून त्यांना नटणं मुरडणं आवडतं. मात्र प्रेमामध्ये पडल्यानंतर ही गोष्ट अधिक प्रकर्षाने वाढते. मुली स्वतःलाच खूपवेळ न्याहळतात. बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!