बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!

प्यार दोस्ती है, हा रोमान्स किंग शाहरुखचा डायलॉन तुम्हालाही चपलखपणे बसतो का?

Updated: Jun 14, 2018, 08:58 AM IST
बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा! title=

मुंबई : प्यार दोस्ती है, हा रोमान्स किंग शाहरुखचा डायलॉन तुम्हालाही चपलखपणे बसतो का? जवळच्या मैत्रिणीशीचं प्रेम झाल्यास? रोमांटिक नात्यात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात- आकर्षण, आपलेपणा आणि वचनबद्धता. आपलेपणा आणि वचनबद्धता या गोष्टी मैत्रितही असतात. पण आकर्षण सर्वांबद्दल नसते. पण जर तुम्हाला तुमची जवळची मैत्रिण आवडू लागल्यास? तिला पाहताच बैचेन वाटत असेल किंवा तिला बघताच मनाला काहीसे बरे वाटत असेल. पण हे प्रेम असल्याची पूर्ण खात्री पटल्याशिवाय पुढचे पाऊल उचलू नका.

काहींची मैत्री इतकी घट्ट असते की इतरांना त्यात प्रेम दिसते. पण वाढलेल्या जवळीकतेमुळे तुम्हालाही प्रेमात असल्यासारखे वाटत का? प्रेमाची जाणीव होताच काहीजण हबकतात. पुढे काय करावे हे त्यांना सुचत नाही. मग मैत्रिणीला कसे सामोरे जावे, हे समजत नसते. 

# जर तुम्हीही तुमच्या मैत्रिणकडे आकर्षित होत असाल किंवा मैत्रीचे नाते पुढे घेऊन जावू इच्छित असाल तर ताबडतोब तुमच्या मनातले मैत्रिणीसमोर बोलू नका. प्रथम तुमच्या मैत्रिणीच्या लहानसहान गोष्टी नोटीस करा. त्यातून तिला असे काही वाटते का? याचा अंदाज घ्या.

# आपल्या मनातील भावना थेट शब्दात मांडू नका. कदाचित तिला तसे वाटत नसेल. त्यामुळे विनाकारण मैत्रीच्या नात्यात अडसर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फक्त इशाऱ्यातून मनातील भावना व्यक्त करा. कदाचित तुमच्या या इशाऱ्यातून ती असे काही बोलले की त्यामुळे तिच्या मनातील भावनाही समजतील.

# तुमच्या मैत्रिणीलाही मैत्रीपलिकडे काही भावना असतील तर मस्तच. पण तसे काही नसल्यास तिच्या मनात फक्त एक मित्र म्हणून तुमची प्रतिमा असल्यास हळूहळू तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. हे थोडे कठीण आहे, पण करावे लागेल. नवे मित्र बनवा व अधिकाधिक वेळ त्यांच्यासोबत घालवा.