मुंबई : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. दिवसभर घामाघूम होणं हे प्रत्येकाला त्रासदायक आहे. अशा परिस्थितीतही काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. या दिवसांतील मिटिंग सुद्धा अत्यंत महत्वाची असते. अशावेळी फ्रेश राहणं अत्यंत गरजेचं असतं. पण उन्हामुळे त्वचा काळवंडते, भरपूर घाम येतो, काखेतून घामाचा दुर्गंध येतो. आणि या दुर्गंधीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून बऱ्याचदा डिओ किंवा परफ्यूम्स मारला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र वारंवार याचा वापर करणं धोकादायक असतं. कारण डीओ आणि परफ्यूमसचा अति वापरामुळे काखेतील त्वचा ही काळी पडू शकतं. तसेच डीओमुळे तेथील त्वचा जळल्यासारखी होते. आणि काहींना त्याच इन्फेक्शन होतं. अशावेळी घरगुती उपाय अत्यंत महत्वाचे असतात. 


काखेतील दुर्गंधी कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय 


नारळाचे तेल :
आंघोळ केल्यानंतर बोटांवर थोडेसे नारळाचे तेल घ्यावे आणि काखेवर लावावे. त्वचा नारळाचे तेल शोषून घेते. दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केला जाऊ शकतो. मात्र, तेल लावण्यापूर्वी आंघोळ तरी करावी किंवा काख स्वच्छ करुन घ्यावेत. नारळाचे तेल काखेत तयार होणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करते.


व्हिनेगर :
कापसाच्या बोळ्याच्या सहाय्यानं व्हिनेगर काखेत लावावे. सकाळ व संध्याकाळी हा प्रयोग केल्यास काखेतून येणारा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. व्हिनेगरमध्ये मायक्रो-बॅक्टेरिअल तत्व असतात, यामुळे नैसर्गिक सुंगध मिळतो.


लॅव्हेंडर ऑइल: 
एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लॅव्हेडर ऑइलचे काही थेंब मिसळावेत.  या स्प्रेचा वापर डीओप्रमाणे दररोज करावा. काखेवर स्प्रे केल्यानंतर घाम आल्यास त्याचा दुर्गंध येणार नाही. लॅव्हेंडर ऑइलमध्ये निसर्गतःच एक सुंगध असून तो दुर्गंध कमी करण्याचे काम उत्तम प्रकारे करतो.


कोरफड :
बोटांवर कोरफडीचा थोडासा गर घेऊन काखेवर चोळावा आणि संपूर्ण रात्र तसाच ठेऊन द्यावा. कोरफडीचा गर नैसर्गिक पद्धतीनं काखेचं आरोग्य सुधारते. काखेतून येणारी दुर्गंधी कमी होते शिवाय टॅनिंगची (काळेपणा) समस्यादेखील कमी होण्यास मदत होते.


बटाटा :
बटाट्याचे काप करुन काखेवर चोळावेत. काही वेळानंतर त्यावर डीओ स्प्रे करावा. दिवसातून एक किंवा दोन वेळा या प्रयोग केल्यास दुर्गंधी येणार नाही. बटाट्यामध्ये काखेची पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म आहेत.