नवी दिल्ली : दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी इराकमधील एका महिलेवर दुर्लभ शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी इराकच्या ६६ वर्षीय महिलेच्या गळ्यातून शस्त्रक्रिया करुन तब्बल ५३ दगड बाहेर काढले आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया कोणतीही चिरफाड न करता करण्यात आली आहे. या संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी दोन तासांचा कालावधी लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेला जेवणानंतर किंवा काही पियाल्यानंतर घसा दुखणं आणि त्याल सूज येणं अशा समस्या होत होत्या. महिलेल्या तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या गळ्यातील पॅरोटिड ग्रंथीमध्ये (parotid gland) अनेक दगड असल्याचं सांगितलं. 


रुग्णालयातून दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या उजव्या बाजूला पॅरोटिड नळीत अनेक दगड होते. सर्वात मोठा दगड ८ मिमी आकाराचा होता. हा दगड नळीच्या मधोमध अडकला होता.


सियालेंडोस्कोपी नावाच्या प्रक्रियेद्वारा महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी १.३ मीमीचा एक छोटा एंडोस्कोप पॅरोटिड ग्रंथीमध्ये टाकण्यात आला. यामुळे गळा कशामुळे दुखतो आहे याबाबत माहिती करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान बास्केट आणि फोरसेप्सचा उपयोग करुन एक-एक दगड काढण्यात आला. 


  


सर गंगाराम रुग्णालयातील ईएनटी सल्लागार वरुण राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मिमीच्या रुंद पॅरोटिड ग्रंथीतून सर्व दगड कोणतीही जखम न होता काढणं हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं.


शस्त्रक्रियेनंतर महिलेला घरी पाठवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी महिला पूर्णपणे बरी झाली असू न ती आता तिच्या आवडीचं सर्व काही खावू शकत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.