Kidney Disease Symptoms : शरीरातील किडनी हा एक महत्त्वपूर्ण भागांपैकी एक भाग आहे. किडनी आपल्या शरीरातील अशुद्धीला फिल्टर करते आणि आपल्याला शरीराला स्वस्थ ठेवते, पण किडनीच्या समस्यांना जर तुम्ही दूर्लक्ष करत असाल तर तुम्ही अडचणीत येवू शकता. अवेळी जेवण करणे, नियमित व्यायाम नसणे, सकस आहार न घेणे या वाईट सवयींमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते. बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकदा किडनीच्या तक्रारी जाणवू लागतात पण वेळीच निदान न झाल्यास किडनीच्या गंभीर समास्येला तुम्हाला तोंड द्यावे लागते. पुढील काही लक्षणे तुम्हालाही जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी थंडी भरुन येणे


जर सकाळी उठताच तुम्हाला तुमचं शरीर थंड जाणवत असेल तर कदाचित तुमच्या किडनीत शाररिक बिघाड झालाय. कोणत्याही ऋतुत जर तुम्हाला सकाळी तुमच्या शरीराचे तापमान खालावले जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरकडे जा.


फेसाळलली लघवी होणे


फेसाळलली लघवी होणे हे किडनी खराब झाल्याचे दुसरे लक्षण आहे. जर तुम्हाला वांरवार लघवी फेसाळली आढळत असेल तर तुमच्या लघवीतील प्रोटीन असल्याचे संकेत देते म्हणजेच तुमची किडनी लघवी नीट फिल्टर करत नसल्याचे दिसते 


वांरवार लघवीला लागणे


सतत जर तुम्हाला थांबून थांबून लघवी होत असेल तर हे चिंतेचे कारण आहे. कारण तुमच्या शरीराचे स्वास्थ बिघडले याचे प्राथमिक लक्षण लघवीतून आढळून येते. त्यामुळे जर तुम्हाला लघवीला साफ होत नसेल किंवा वांरवार लघवी थांबून थांबून होत असेल तर किडनी खराब असल्याचे हे लक्षण असू शकते.


शरीराला सूज येणे


अनेकदा तुम्हाला हाता पायावर सूज सतत असल्याचं जाणवलं तर अजिबात दूर्लक्ष करु नका कारण हे सुद्धा किडनी खराब झाल्याचे संकेत असू शकतात. कारण किडनीची समस्या असेल तर शरीराला सूज येण्याचं प्राथमिक लक्षण दिसून येतं. 


अंगाला खाज येणे


जर तुमच्या शरीराला खाज येत असेल तर याचे कारण एकतर तुम्हाला मुतखड्याची समस्या असेल किंवा किडनी खराब झाल्याचे लक्षण असू शकेल. त्यामुळे शरीरात तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असेल तर वेळीच काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लक्षणं आढळून येत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)