मुंबई : वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालील ७ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वजन वाढवू शकता.


सॅलमन - सॅलमनचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वजन वाढवू शकता. यासाठी सॅलमन ऑलिव्ह ऑईल आणि बटरमध्ये शिजवा. 


बटाटे - बटाट्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन सी असते. दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते. 


पीनट बटर - तुम्हाला नैसर्गिकपणे वजन वाढवायचे असल्यास पीनट बटर हा उत्तम पर्याय आहे. दररोजच्या आहात एक चमचा पीनट बटर खा. 


मिक्स ड्रायफ्रुट - सुका मेव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सुका मेव्यामध्ये ५००-६०० कॅलरीज असतात. तसेच यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, व्हिटामिन ई आणि फायबर असतात. 


अंडी - अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन डी आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. वजन वाढवण्यासाठी अंडी खा.


चीज - प्रत्येकी १० ग्रॅम चीजमध्ये ४०० कॅलरीज असतात. चीजमध्ये प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फॅट आणि कॅल्शियम असते. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही दररोज चीज खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते. 


केळी - वजन वाढवण्याचा मस्त आणि स्वस्त उपाय म्हणजे केळी. केळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषकतत्वांचा मोठा भरणा असतो. केळ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. एका मीडियम साईजच्या केळ्यामध्ये १२० कॅलरीज असतात. दररोजच्या आहारात केळ्याचा समावेश केल्यास नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.