harmful foods for bones calcium News In Marathi : हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आवश्यक असते. त्याची कमतरता शरीरात निर्माण झाली तर हाडे कमकुवत व निर्जीव होतात. यामुळे थोड्याशा धक्क्यानेही सतत हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. कॅल्शियम केवळ हाडे मजबूत करत नाही तर दात, मेंदूसाठी देखील आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त चहा आणि कॉफीचे सेवन केले तर तुमची हाडे कमकुवत होऊन सांगाडा होऊ शकतात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर कॅफिन असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीठ - तुम्ही जितके जास्त मीठ खाणार तितकेच तुमची हाडे कमजोर होतील बनतील. आणि कॅल्शियम कमी होत जाईल.


साखर - जे लोक अति गोड खातात, त्यांचे हाडे कमजोर होतात. कारण साखर हाडातली कॅल्शियम शोषून घेते तसेच मधुमेहासाख्या अनेक गंभीर आजारांना सुद्धा आमंत्रण मिळू शकते. 


कोल्ड्रिंक - अति प्रमाणात कोल्ड्रिक्स किंवा सोडा प्यायल्याने हाडातील कॅल्शियम नष्ट होऊ लागते. त्यामुळे हे पदार्थ टाळले पाहिजेत. 


चहा, कॉफी, चॉकलेट - हे पदार्थ आपल्या हाडातील कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करतात आणि हाडे कमकुवत बनतात.  अभ्यासात असे आढळून आले की कॅफीनचा वापर जास्त करणाऱ्या स्त्रियांमध्ये कमी हाडांच्या घनता दिसून आली आहेत. या दोन्ही बाबी जास्त गंभीर आहे म्हणूनच शक्य असल्यात आताच सावध व्हा आणि चहा , कॉफीचे कमी प्रमाणातच सेवन करा. 


अल्कोहोल - अल्कोहोलचे सेवन हाडांना कमकुवत तर बनवतातच शिवाय हाडांची डेन्सिटी म्हणजे हाडांची घनता सुद्धा कमी करते परिणामी हाडे ठिसूळ बनवतात.


बटाटा, टोमॅटो, मशरूम, मिरची - काही पदार्थ ऑक्सॅलिक ऍसिडचे चांगले स्त्रोत आहेत आणि ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. इतकेच नाही तर ते कॅल्शियम शरीरातून बाहेर पडू शकतात.


सोडियमचे आधिक्य असणारे पदार्थ - सोडियमचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नामुळे कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. हे तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकण्याचे प्रमाण वाढवू शकते आणि कॅल्शियमचे शोषण कमी करू शकते.


व्हिटॅमिन डी- व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. म्हणून, व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून कॅल्शियम योग्यरित्या शोषले जाईल.


काजू आणि बदाम - फायटेट्स कॅल्शियम शोषण कमी करू शकतात. यासाठी तुम्हाला फायटेट्स समृद्ध पदार्थांसह कॅल्शियमचे प्रमाण चांगले घ्यावे लागेल. फायटेट्स असलेल्या पदार्थांमध्ये खालील पदार्थांचा समावेश होतो.