Covid Reduce Life Expectancy News In Maarathi : गेल्या चार वर्षापासून कोरोना संसर्गाची भिती काय अद्याप गेलेली नाही. कोरोना महामारीमुळे आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम दिसून येत आहेत. हे परिणाम स्थानिक पातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर दिसून येत होते. दरम्यान कोरोना झालेल्यापैकी काही जणांवर त्याचे अजूनही परिणाम दिसून येतो. एकंदरीत हा अहवाल मानवी जातीसाठी चिंता निर्माण करणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड संदर्भात नुकताच लॅन्स्टेचा अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये संशोधकांनी सांगितले की, कोविड महामारीमुळे जगभरातील लोकांचे सरासरी आयुष्य सुमारे 1.6 वर्षांनी कमी झाले आहे. संशोधकांच्या मते, गेल्या काही दशकांमध्ये जागतिक आयुर्मानात बरीच सुधारणा झाली होती. मात्र आता कोरोना महामारीने अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 


लॅन्स्टेच्या संशोधनात असे दिसून आले की कोरोनाची लागन झाल्यानंतर त्यामधून ही बरे झालेल्या  लोकांमध्ये व्हायरसचे ट्रेस एक वर्षापेक्षा जास्त काळ असू शकतात. याशिवाय लॉंग कोविडमधील रुग्णांमध्ये ह्रदय, फुफ्फुस आणि मेंदु संबंधित समस्या दिसू येत आहेत. कोविडचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यामध्ये कोविड महामारीमुळे जगभरातील लोकांचे सरासरी आयुष्य सुमारे 1.6 वर्षांनी कमी झाल्याचे निर्देशनात दिसून आले. याबाबत आरोग्यतज्ञांनी सांगितले की हा कोरोनाचा सर्वात गंभीर दुष्परिणाम आहे. 


संशोधकांनी काय म्हटलं?


संशोधकांनी सांगितले की, 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये पाच वर्षांखालील सुमारे पाच लाख मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगभरातील कोरोना महामारीमुळे विविध देशांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे आरोग्य संस्था आणि एजन्सी सतर्क झाल्या आहेत. अंदाजानुसार 2020-2021 दरम्यान 15.9 दशलक्ष किंवा त्याहून अधिक मृत्यूसाठी कोविड जबाबदार असेल. या सोबतीने मानवी आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवली आहे. कोविडचे दीर्घकालीन दुष्परिणाम रुग्णांमध्ये अजूनही दिसून येतात. त्याचे परिणाम जवळजवळ सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतात.


पुरुष मृत्यू दरात 22% वाढ


कोरोनाच्या काळात 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण 22 टक्क्यांनी वाढले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण 17% वाढले आहे. 2020 ते 2021 दरम्यान 13.1 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 1.6 कोटी मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोविड19 मुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर कमी झाला आहे.