Cheating Partners: माणूस जसजसा वयात येतो आणि मोठा होयला लागतो त्याप्रमाणे त्याला जवळच्या माणसाचा सहवास हवा असतो. त्यासाठी आपण त्या वयात आपल्या लाईफ पार्टनरच्या शोधात असतो. काही जण आपल्या आयुष्यात आपल्याला हवा तसा लाईफ पार्टनर शोधण्यात यशस्वी ठरतात तर काही जण अयशस्वी ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नात्यात फसवणूक आली की सगळंच काही बिघडते. 


IllicitEncounters.com ने एक सर्वेक्षण केले आहे ज्यांचे म्हणणे आहे की लोकं सप्टेंबर महिन्यात आपल्या पार्टनरला सर्वात जास्त फसवतात...


'सेक्स टेम्बर' नावाच्या प्रसिद्ध वेबसाइटने एक सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये प्रियकर-प्रेयसी आपल्या जोडीदाराची सर्वाधिक फसवणूक सप्टेंबर महिन्यात करतात. इतर कोणत्याही महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ब्रेकअपच्या 22 टक्के अधिक घटना घडल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार सप्टेंबर महिन्यात 32 टक्के महिला आणि 34 टक्के पुरुष आपल्या प्रियजनांना अधिक फसवतात अशी माहिती समोर आली आहे. 


काय आहेत कारणं? 
फसवणूक करणाऱ्या कपल्सचा अभ्यास करण्यात आला आहे ज्यामध्ये असे आढळून आले की ज्या लोकांचा स्वभाव बेफिकीरीचा असा असतो त्यांना एकाच जोडीदारासोबत राहण्याचा कंटाळा येतो आणि त्यांच्यात आपल्या जोडीदाराबद्दलचं आकर्षण कालांतराने कमी होऊ लागते.


या संशोधनात 21 टक्के पुरुष आणि 19 टक्के महिलांचे ऑफिसमध्ये अफेअर असल्याचे समोर आले आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जोडीदार शोधणे सामान्य झाले आहे. सप्टेंबरनंतर जानेवारी हा महिना असतो ज्यामध्ये फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात. 24 टक्के पुरुष आणि 22 टक्के स्त्रिया वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करतात अशाही माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.