वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका व्यक्तीला 'सिमेन अटॅक'साठी 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. पुरुषाने एका महिलेवर सीमनने भरलेल्या सिरिंजने 'हल्ला' केला. किराणा दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या शरीरात त्याने वीर्याने भरलेली सिरिंज घातली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द सन न्यूजच्या हवाल्याप्रमाणे, मेरीलँडच्या सुपरमार्केटमध्ये केटी पीटर्स नावाची महिला शॉपिंग करण्यासाठी गेली होती. या दरम्यान, थॉमस ब्रायन स्टीमेन नावाच्या व्यक्तीने वीर्याने भरलेली सिरिंज त्या महिलेला टोचली.


51 वर्षीय थॉमसने चलाखीने त्या महिलेवर 'सीमन अटॅक' केला. एवढेच नाही, जेव्हा सिरिंज टोचल्याबरोबर महिलेला वेदना झाल्या त्यावेळी थॉमस त्या महिलेला म्हणाला, "मला माहित आहे, मधमाशी चावल्यासारखे वाटतं, नाही का?" इतकं झाल्यानंतरही तो व्यक्ती त्या महिलेच्या शेजारी गपचूपपणे उभा होता.


अहवालानुसार, केटी पीटर्सवर हा 'हल्ला' फेब्रुवारी 2020 मध्ये झाला होता. मुख्य म्हणजे दुकानात लावलेल्या एका कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली आहे. थॉमसच्या या कृत्यावर पोलिसांनी कारवाई केली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. 18 महिन्यांनंतर, थॉमसला आता 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.


पीडित महिलेने CBS Baltimore सांगितलं की, स्टोअरमध्ये प्रवेश करताना तिला थॉमसने धडक दिल्याचं तिला वाटलं. काही सेकंदांनंतर तिला तिच्या कंबरेजवळ सिगारेट जळत असल्यासारखं जाणवलं. जेव्हा ती घरी गेली त्यावेळी तिला कंबरेच्या ठिकाणी जळजळ जाणवली. 


यानंतर ती महिला पुन्हा दुकानात आली आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर तिला संशय आला. पोलिसांनी तक्रारीवर तपास सुरू केला तेव्हा सत्य बाहेर आले. थॉमसच्या कारमधून आणखी अनेक सिरिंज जप्त केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत त्याने इतर लोकांसोबतही हे कृत्य केलं असावं.