कॅन्सरच्या उपचारांसाठी मुंबईत आलात, तर कुठे रहाल ?
कॅन्सर या दुर्धर आजाराचं नाव ऐकूनच अनेकांचा थरकाप उडतो.
मुंबई : कॅन्सर या दुर्धर आजाराचं नाव ऐकूनच अनेकांचा थरकाप उडतो. पुरेसे लक्ष न दिल्यास कॅन्सर अंतिम टप्प्यामध्ये पोहचल्यानंतरच त्याच निदान होतं. अशावेळेस ग्रामीण भागात योग्य अद्ययावत उपचार उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेकजण मुंबईतील टाटा मेमेरिअल रूग्णालयात उपचारांसाठी धाव घेतात.
महाराष्ट्राप्रमाणेच भारतातूनही अनेक रूग्ण टाटामध्ये उपचारासाठी दाखल होतात. मात्र एका भेटीत सारे उपचार किंवा वैद्यकीय चाचण्या होणं शक्य नसल्याने अनेकजणांना पुढील काही दिवसांसाठी मुंबईत वास्तव्याला रहावं लागतं. नेमके रहावे कुठे? योग्य राहण्याची सुविधा कुठे उपलब्ध आहे याबाबत अनेक रूग्णांना माहिती नसते. म्हणूनच या ठिकाणी उपचारादरम्यान राहण्याची सोय होऊ शकते क? हे तपासून पहायला विसरू नका.
कॅन्सर रूग्णांसाठी कुठे करण्यात येते राहण्याची सोय?
टाटा कॅन्सर मेमोरियल रूग्णालयात उपचार घेताना 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस' या तत्त्वावर रूग्णांना सोय करून दिली जाते. याकरिता टाटा रुग्णालयाकडून स्मार्ट कार्ड आणि डिस्चार्ज कार्ड दाखवून रहण्याची सोय केली जाते. रूग्णांना 4-6 आठवडे राहण्याची सोय केली जाते.
रूग्णांना काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी माफक दरात सोय उपलब्ध करून दिली जाते.
मुंबईत कुठे केली जाते सोय ?
Dr. Ernest Borges Memorial Home - वांद्रा, कलानगर
नाना पालकर स्मृती समिती, 158, रूग्ण सेवा सदन मार्ग, नरे पार्क परेल
भारत सेवा सदन, 18 A, दादा साहेब फाळके मार्ग, रणजीत स्टुडिओ दादर ( पूर्व )
अहुजा धर्मशाळा, सेंट पॉल स्ट्रीट, हिंदमाता सिनेमा मागे, दादर ( पूर्व)
द बॉम्बे मदर अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर सोसायटी, 31, बीडीडी चाळ, ना. म. जोशी मार्ग, बावला मस्जिद लोअर परेल
संपर्क - 022-23088942, 9967928271
bmcws1919@gmail.com
द बॉम्बे मदर अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर सोसायटी, 50, बीडीडी चाळ, टिळक हॉस्पिटल्सच्या समोर, गांधी मैदान वरळी
संपर्क - 022-24931939,9172533142
bmcws1919@gmail.com
ब्रिज गौरी ट्रस्ट, सेक्टर 1, 833, इमारत क्रमांक 88, सी जी एस कॉलनी, अॅन्टॉप हिल
संपर्क - Mr. Pabitra,9702373090
Pabitramohan1980@gmail.com
श्रद्धा फाऊंडेशन, चेंबूर कॅम्प, लाल मिट्टी गार्डन, गुरूनानक नर्सिंग होम, पहिला मजला, चेंबूर
संपर्क - 9920745805
Shraddha4cancer@yahoo.com
गुरूद्वारा रावळी कॅम्प,मुकुंदराव आंबेडकर मार्ग, सरदारनगर 2, सायन कोळीवाडा.
संपर्क -9322086247
महाराष्ट्र गेस्ट हाऊस, रंगोली टाईम कॉम्प्लॅक्स जवळ, डॉ, बी. ए. रोड परळ
संपर्क - मोहम्मद अन्वर 24147987
शांती भवन गेस्ट हाऊस, वाडिया हॉस्पिटल्स समोर, आचार्य दोंदे रोड, परेल
संपर्क - 24135531,24130526
Bhshah09@gmail.com
हॉटेल हरी ओम,252, परेल फ्लायओव्हर ब्रिज, परेल टीटी, मुंबई
संपर्क - 24112791, 24113103
www.hotelhariom.com
श्री. एम.डी. अहुजा ट्रस्ट, 132, सेंट पॉल रोड, दादर पूर्व, मुंबई
संपर्क - 24162490
ahujatrust@gmail.com
cc : shyam_motwani@yahoo.com
म्हस्कर हॉस्पिटल्स, 31, बी डी डी चाळ, सखुबाई मोहिते मार्ग, ना म जोशी
जोशी पोलिस स्टेशन जवळ , लोअर परेल
संपर्क - 9967928271,23088942
मफतलाल मोहनलाल धर्मशाला, फोर्ट, मुंबई, सेंत जोर्ज हॉस्पिटल्स
संपर्क - 022-22614050, 9869540015
Likeyou.amol@gmail.com
नवी मुंबई -
जगन्नाथ कॅन्सर एड फाऊंडेशन, ओम दीप इमारत, प्लॉट क्रमांक 755, साई बाबा मंदीराजवळ, कोपरखैरणे
संपर्क - 9323597244
आरोग्य भवन बंगला, प्लॅट 65/66, सेक्टर 19C, कोपरखैरणे
संपर्क - 9870045407
deepsikhafoundation@gmail.com
लहान मुलांसाठी -
St. Jude Childcare Centre, इंडियन कॅन्सर सोसायटी, जेरबाई वाडिया मार्ग, मुंबई
St. Jude Childcare Centre, टाटा हॉस्पिटल्स खारघर, सेक्टर 22, नवी मुंबई
गोल्डन ज्युबली बिल्डिंग, टाटा हॉस्पिटल्समध्ये काऊंटर नंबर 54 वर राहण्याच्या सोयीबाबत अधिक माहिती दिली जाते.