मुंबई : शरिराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. असेही म्हणता येईल की शरिराचं तंत्रच बिघडतं. पाणी पिण्याची योग्य पद्धतही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्तीत जास्त लोक हे उभे राहून पाणी पितात. पण पाणी पिण्याची ही पद्धत आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगली नाहीये. आयुर्वेदानुसार उभ्याने पाणी पिल्यास किडनी संबंधी समस्या आणु आर्यराईटीस सारख्या आजारांची शक्यता असते.


पचना संबंधी आजार - जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने फूड पाईपच्या माध्यमातून खाली जातं. ज्यामुळे पोटाच्या अंतर्गत भागाला इजा होतात. असे पुन्हा पुन्हा झाल्यास पचनक्रियेचं तंत्र बिघडतं आणि अनेक आजार होतात.


आर्थरायटीस - उभे राहून पाणी पिल्यास शरिरातील अवयवांमध्ये असलेल्या पदार्थांचं संतुलन बिघडतं. ज्यामुले आर्थरायटीसची समस्या तोंड वर काढते. 


किडनीची समस्या - जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी फिल्टर न होताच किडनीतून वाहून जातं. यामुळे किडनी आणि मूत्राशयामध्ये घाण राहते. या कारणाने मूत्रमार्गामध्ये संक्रमण किंवा किडनीच्या आजारांची शक्यता वाढते.