मुंबई: अनेक खाद्यपदार्थ गुळाचा वापर होत असतो. आजकाल लोक साखरे ऐवजी गूळ खाणं जास्त पसंत करतात. गूळ आरोग्यासाठी जास्त फायद्याचा असतो. आपण बाजारात जाऊन थेट गूळ घेऊन येतो. मात्र हा गूळ केमिकल युक्त तर नाही ना याची साधी आपल्याला कल्पनाही नसते. केमिकलयुक्त गूळ आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. हा म्हणाला हे कसं ओळखाचं? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक खाद्य पदार्थांप्रमाणेच गुळामध्येही भेसळ होऊ शकते. केमिकल असलेला गूळ तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतो. म्हणूनच केमिकलयुक्त आणि केमिकल नसलेला गूळ कसा ओळखावा हे माहित असणं आताच्या घडीला खूप महत्वाचे आहे. योग्य आणि बनावट गूळ कसा ओळखावा हे शेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे. त्यांनी काही छान टिप्स दिल्या आहेत. त्याच्या मदतीने आपण केमिकलयुक्त गूळ ओळखू शकता.


कसा ओळखायचा केमिकलयुक्त गूळ


गुळामध्ये सोडा सर्वात जास्त वापरला जातो. सोडा मिसळलेला गूळ अधिक पांढरा असतो. अशा रसायनात मिसळलेला गूळ पाहून तुमच्या डोळ्यांना तो खूप चांगला दिसेल. पण त्याची गुणवत्ता मात्र चांगली नसते.


गूळ हे कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यांचं मिश्रण असतं. कॅल्शियम कार्बोनेटमुळे गुळाचं वजन वाढवतं. दुसरीकडे कॅल्शियम बायकार्बोनेटमुळे गुळाला चकाकी आल्यासारखा दिसतो. तो दिसायला खूप छान आणि पॉलिश केल्यासारखा दिसतो. पण या गुळामुळे आरोग्याला खूप नुकसान पोहोचू शकतं.



खरा गूळ दिसायला गडद तपकिरी किंवा काळा दिसतो. तुम्हाला रासायनिक गुळामध्ये काळा किंवा तांबडा रंग नाही तर पिवळट किंवा वेगळाच रंग दिसेल. गूळ जितका गडद असेल तितका तो शुद्ध असं म्हटलं जातं. म्हणून गूळ खरेदी करताना हे लक्षात ठेवा. केमिकलयुक्त गुळाची चव कडू आणि खारट असते. केमिकलयुक्त गुळामध्ये साखरेचे कण मिसळलेले असतात.


जर गुळाला पाण्यात बुडवून विरघळवण्याचा प्रयत्न केलात आणि तो पटकन विरघळला नाही किंवा खाली जमा झाला तर समजावं की यामध्ये भेसळ करण्यात आली आहे. गूळ खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते. इतकंच नाही तर एनिमिया असणाऱ्यांनी तर रोज गूळ खायला हवा. लीवर डिटॉक्सिफिकेशन आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.