फणस खाल्याचे आरोग्याला फायदे तोटे
फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
मुंबई : सध्या बाजारात फणस सर्वत्र मिळते. फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. डॉक्टर देखील हे खाण्याचा सल्ला देतात. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात. फणसाला इंग्रजीमध्ये Jackfruit असे म्हणतात.
फणस खाल्याणे होणारे फायदे
- फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर पानांचे चूर्ण तयार करा. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात.
- तोंड आल्यास फणसाची कच्ची पाने चावून थुंकल्याने तोंडाचे विकार कमी होतात.
- मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित फणसाच्या पानांच्या रसाचे सेवन करणे फायद्याचे असते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे.
- फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या किंवा दुखापत झलेल्या भागात लावल्यास आराम मिळतो. गुडघ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.
- फणसाच्या कोवळ्या पानांना बारीक करून त्यापासून लहान - लहान गोळ्या तयार करा. त्यामुळे गळ्याचे आजार कमी होतात.
- पिकलेले फणस खाल्याणे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात.
- दमा असलेल्या रूग्णांसाठी फणसाची मूळे फार गुणकारी असतात. फणसाच्या मुळांना उकळून, त्या पाण्याच्या सेवनाने दमा नियंत्रित राहण्यास मदत होतो.
- जर तुम्ही थायरॉइडच्या समस्येचा सामना करत असाल, तर तुम्ही फणस सेवन करावे. फणसात कॉपर तत्व असतात, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव संतुलित राहतो.
- फणसात असलेल्या मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत होतात.
- फणसाच्या बियांच्या पावडरमध्ये मध मिसळून लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
फणस आरोग्यासाठी असला, तरीही त्याचे तोटे देखील आहेत.
पिकलेल्या फणसामुळे कफ होतो, त्यामुळे सर्दी-खोकला, अजीर्ण इत्यादी आजार तसेच गर्भवती स्त्रियांनी फणसचे सेवन करू नये. तसेच फणस सेवन केल्यावर, पान खाण्यामुळे पोट फुगते. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर पान खाऊ नये