Age Weight Chart : प्रत्येकाला फीट आणि फाईन रहायला आवडतं. वाढलेलं वजन ( Weight ) किंवा लठ्ठपणा हा कोणालाच आवडत नाही. यासाठीच अनेकजण अनेक वेळा लोक वय ( Age ) आणि उंचीनुसार ( height ) वजनाची मोजमाप करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुमचं वजन आपली जीवनशैली, शरीराचा प्रकार, दैनंदिन व्यवहार यावर अवलंबून असतं. मात्र वय ​​आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या उंची आणि वयानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे.


उंचीच्या हिशोबाने मोजावं वजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BMI म्हणजेच Body mass index च्या मदतीने तुम्ही तुमच्या उंचीनुसार वजन ठरवू शकता. बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून तुम्ही ठरवू शकता की, तुमचं वजन जास्त आणि कमी. बॉडी मास्क इंडेक्सचं प्रमाण काय सांगतं?


  • एखाद्याचा BMI 18.5 पेक्षा कमी असेल, तर त्याचं वजन कमी आहे.

  • 18.5 ते 24.9 मधील बीएमआय हा चांगला मानला जातो. 

  • बीएमआय 25 ते 29.9 पर्यंत आहे त्यांचे वजन जास्त मानले जाते

  • याशिवाय जर बीएमाय 30 पेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणाचे लक्षण मानलं जातं.


उंचीनुसार वजन किती असलं पाहिजे?


  • 4 फीट 10 इंच - 41 से 52 किलो वजन

  • 5 फीट इंच - 44 से 55.7 किलो वजन

  • 5 फीट 2 इंच - 49 से 63 किलो पर्यंत

  • 5 फीट 4 इंच - 49 से 63 किलो पर्यंत

  • 5 फीट 6 इंच - 53 से 67 किलो वजन

  • 5 फीट 8 इंच - 56 से 71 किलो पर्यंत वजन

  • 5 फीट 10 इंच - 59 से 75 किलो पर्यंत वजन

  • 6 फीट इंच - 63 से 80 किलो पर्यंत वजन


तुमच्या वयोमानानुसार, तुमचं वजन किती असलं पाहिजे?


  • 19-29 वयोगट - पुरुषांचं वजन 83.4 किलो तर महिलांचं वजन 73.4 किलो असलं पाहिजे.

  • 30-39 वयोगट - पुरुषांचं वजन 90.3 किलो आणि महिलांचं वजन 76.7 किलो असलं पाहिजे.

  • 40-49 वयोगट - पुरुषांचं वजन 90.9Kg तर महिलांचं वजन 76.2 किलो असलं पाहिजे.

  • 50-60 वयोगट - पुरुषांचं वजन 91.3 किलो आणि महिलांचं वजन 77.0 किलो पर्यंत असलं पाहिजे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)