मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. त्यामुळे पदार्थ रुचकर होतात. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात त्यामुळेच स्वयंपाकघरातच नव्हे, तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. भारतात महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी ओव्याचे पिक घेतले जाते. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असणे फारच गरजेचे आहे. प्राचीन काळापासून ओव्याचा आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिनेदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो.


- सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास मधुमेहाचा धोकाही कमी होतो.


- हृदयासंबंधित अनेक आजारांवर ओव्याचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे 


- दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.


- पोट दुखत असल्यास अथवा अपचनाचा त्रास जाणवल्यास ओव्याचे पाणी प्या.


- ओव्याचे पाणी नियमित प्यायल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.


- सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.


- तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास ओव्याच्या पाण्यामध्ये एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे.


- तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल्यास ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.


- पोटात जंतू झाल्यास ओव्याच्या पाण्यात एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे. जंताचा त्रास दूर होण्यास मदत होते.


- झोपलागत नसल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.