फायदा कळेल तर, केळी नव्हे सालच खाल
केळीची साल गुणकारी असते. म्हणूनच जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे ....
मुंबई : बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच नव्हे तर, केळीची सालही तितकीच आरोग्यदाई असते. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. इतकी केळीची साल गुणकारी असते. म्हणूनच जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे.......
वजन घटविण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुम्ही जर रोज एका केळीची साल खाल तर, एक महिन्यात तुमचे वजन २ ते ३ किलोंनी घटलेले पहायला मिळू शकते. ते सुद्धा कोणत्याही व्यायामाशिवाय. सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीत असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी करते.
दृष्टीदोषावर गुणकारी
तुमाला दृष्टीदोषाचा त्रास असेल, त्यामुळे चष्मा वापरण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे डोळयाची नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.
मन प्रसन्न करण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये सेरोटोनिन असते जे तुमचे मन प्रसन्न (मूड) करण्यासाठी फायदेशीर ठरते. तैवानच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार सलग तीन दिवस नियमीतपणे २ केळीच्या साली खाल तर तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या हॉर्मोनची मात्रा १५ टक्क्यांनी वाढते.
झोपेवर गुणकारी
जर तुम्हाला योग्य प्रकारे झोप येत नसेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. जे तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करते.