मुंबई : आपल्या भारतीय सणांमध्ये गुळाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळी, गणपती, दसरा गुढीपाडवा यांसारख्या सणांना गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पुरणपोळी, चिक्की यांसारखे पदार्थ गुळापासून तयार केले जातात. साखरेपासून गूळ तयार होते. तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. आधीच्या काळी जर कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर घरातील मंडळी पाणी आणि गूळचा खडा अवश्य देत असे. कारण गूळ हा उष्णता वर्धक पदार्थ आहे. म्हणून गुळाचे रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. डॉक्टर सुद्धा गुळाचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. तर काय आहेत गूळ खाल्याचे फायदे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- गूळ आणि आले एकत्र गरम पाण्यात प्यायल्याने घश्यात होणारी खवखव कमी होते. गुळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होतो.


- नियमित गुळाचे सेवन केल्याने पचन क्रियेत अधिक सुधारणा होते. त्याप्रमाणे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटीच्या समस्या दूर होतात. 


- गुळामूळे रक्त दाब नियंत्रीत राहते. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. 


- शेंगदाणे आणि गूळ खाल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. 


- रोज गूळ खाल्याने शरीरातील ऊर्जा वाढते, यासोबतच रक्तातील साखर वाढत नाही. 


- गुळामूळे आतड्य़ांचे कार्य चांगले राहते. रक्तातून हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत होते. 


- गुळात सोडीयम, पोटॉशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे ही पोषकतत्वे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.