Eye Care Juice: डोळ्याची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आवळ्याचा रस, असा करावा वापर
Amla juice for eye sight and immunity : आवळ्याचा ज्यूस तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरतो. जाणून घ्या त्याचे फायदे.
Eye care : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे. हिवाळा सुरु झालाय. वातावरण बदललं की आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या सुरु होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. ज्याचा डोळ्यांवर देखील दुष्परिणाम होतो. आयुर्वेदिक आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून तुमची दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची दृष्टी चांगली होऊ शकते. आवळा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. व्हिटॅमिन-सी आणि फ्लेव्होनॉइड्सचा त्वचेला फायदा होतो. हा नैसर्गिक आवळ्याचा रस बद्धकोष्ठता किंवा बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी करतो आणि पोटाशी संबंधित इतर आजारांवर गुणकारी सिद्ध होतो.
आवळ्याचा रस डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करतो. सोबतच तो आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं ही काम करतो. आवळ्यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांच्या लालसरपणापासूनही आराम मिळतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.