Bad Cholesterol वर अर्जुन साल रामबाण! हृदयाच्या सर्व बंद शिरा उघडण्यासाठी कसा करायचा वापर?
तुम्ही Bad Cholesterol मुळे त्रस्त आहात, मग अर्जुनाच्या सालाचं सेवन तुमच्यासाठी रामबाण ठरेल. या उपायामुळे कोलेस्ट्रॉल घटेल शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळेल.
बदललेली जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्याचा भडीमार यामुळे असंख्य लोकांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढतेय. यामुळे हार्ट ब्लॉकेज आणि हृदयाशी संबंधित आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. शिवाय हृदयाला ऑक्सिनज पोहोचण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या सर्व बंद शिरा उडण्यासाठी अर्जुनाची साल फायदेशीर ठरते असं तज्ज्ञ सांगतात. कसा करायचा अर्जुन सालाची उपयोग आणि तिचे गुणधर्म जाणून घ्या.
अर्जुनाची साल गुण!
अर्जुनाची साल आयुर्वेदात अतिशय महत्त्व असून अनेक औषधांमध्ये तिचा उपयोग केला जातो. अर्जुनाची सालमध्ये एलॅजिक ॲसिड, बीटा-सिटोस्टेरॉल, मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड आढळते जे कॅन्सर, खराब कोलेस्टेरॉल, मधुमेह यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरतं. अर्जुनाच्या सालामध्ये असलेले हायपोलिपीडेमिक शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदतगार ठरते. शिवाय रुग्णांच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास फायदेशीर ठरतं.
कसा करायचा अर्जुन सालाची वापर!
अर्जुन बार्क आणि दालचिनी चहा
खराब कोलेस्ट्रॉलचे रुग्ण औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या अर्जुनाची साल चहा किंवा काढ्याचा स्वरूपात घेऊ शकतात. सगळ्यात पहिले एका कढईत 3 कप पाणी घ्या आणि ते गॅसवर उकळायला ठेवा. आता या पाण्यात 2 ते 3 ग्रॅम अर्जुनाची साल आणि 1 ते 2 ग्रॅम दालचिनी बारीक करून टाका. आता हा काढा अजून काही वेळ उकळू द्या. कपात एक वाटी पाणी शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा आणि या प्यायचं सेवन करा. जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुम्हाला त्याचे भरपूर फायदे दिसून येतील. या चहा किंवा काढ्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं आणि तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कायम राहते आणि कॅन्सरसारख्या आजारांपासूनही तुमचा बचाव होतो.
हेसुद्धा वाचा - Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी
अर्जुनाची साल या समस्यांवर प्रभावी!
अर्जुनाची साल हृदयरोग्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. या काढाच्या सेवनाने बीपीही नियंत्रित राहण्यास मदत मिळते. याशिवाय, कमकुवत हाडे मजबूत होतात. अतिसारात देखील हा काढा फायदेशीर आहे. तोंडाचे व्रण आणि संधिवात असलेले रुग्णही या चहाचे सेवन करु शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)