पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, `या` पदार्थांचा आहारात समावेश करावा
उघड्यावरच्या पदार्थांमुळे अनेक पोटाचे विकार उद्भवतात.
मुंबई : पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकंवर काढतात. उघड्यावरच्या पदार्थांमुळे अनेक पोटाचे विकार उद्भवतात. पावसाच्या दिवसांमध्ये शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत.
- पावसाळ्यात पचनक्रिया हळू होत असते त्यामुळं तळलेले पदार्थ खाऊ नये, नाही तर त्यानं अॅसिडिटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
- तुळस, आलं, पुदिना, हळद, हींग, जिरे, कढीपत्ता या पदार्थांचा रोजच्या जेवणात अधिक प्रमाणात समावेश करावा. यामुळे पचनसंस्था मजबूत होईल तसंच पोटासंबंधातील विकार देखील उद्भवणार नाहीत. यामध्ये अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या होत नाहीत.
- पोट साफ ठेवण्यासाठी थोड्या प्रमाणात मध खाणे उपयुक्त असते. मध आतड्यांना साफ ठेवते. मेथीदाणे, हळद आणि कारले यांचे संक्रमण केल्यामुळे जीवाणूंचे संक्रमण होत नाही. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आंबट आणि व्हिटॅमीन-सी युक्त फळे खायला हवीत.