व्यायाम करताना `असा` निष्काळजीपणा करणं टाळा, नाहीतर...
तिरिक्त चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबतच योग्य व्यायामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
मुंबई : आपण व्यायाम का करतो याच्या दोन मुख्य कारणांपैकी एक म्हणजे आपल्याला आपला लठ्ठपणा कमी करायचा आहे आणि दुसरं म्हणजे फीट राहण्यासाठी. परंतु दोन्ही परिस्थितींमध्ये व्यायामाच्या वेळेला खूप महत्त्व आहे. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबतच योग्य व्यायामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
दररोज व्यायामाचा अनेकांना कंटाळा येतो. काहीवेळी आपण एक दिवस व्यायाम करणं टाळतो. मात्र व्यायामादरम्यान होणारा निष्काळीपणा आपण टाळला पाहिजे.
वेळेचं महत्त्व
एका अभ्यासानुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आठवड्यातून सुमारे 150-250 मिनिटं व्यायाम करा. डाएटिंग करताना एखाद्या व्यक्तीने कॅलरीजचं प्रमाण कमी केलं तरीही दर आठवड्याला 150 ते 250 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे.
वर्कआउट रूटीन
जर तुम्ही तुमचं वर्कआऊट नियमित केलं नाही तर तुमचं वजन सहजासहजी कमी होणार नाही. त्यामुळे, लठ्ठपणा नियंत्रणासाठी वर्कआूट करावं लागेल. दररोज 30 ते 35 मिनिटे व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
एक्सरसाइज आणि त्याची वेळ
जर तुम्ही वेळेअभावी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जिममध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही स्वतः काही व्यायाम करून तुमचं वजन कमी करू शकता. धावणं, सायकल चालवणं, पोहणं यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही व्यायाम आणि त्यांच्या वेळेचं पालन केलं तर ते तुम्हाला एका आठवड्यात सुमारे 500 ग्रॅम कॅलरी बर्न करण्यात मदत करतात.