मुंबई : आपली लाईफ स्टाईल ही अनेक गोष्टींवर आधारित असते. आणि याच लाईफस्टाईलचा प्रभाव आपल्या शरीरावर होताना दिसत असतो. थायरॉईड असलेल्या लोकांवर याचा अधिक परिणाम होत असतो. थायरॉईड, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर सारखे आज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यासारख्या आजारांची लक्षणे अगदी लगेच समोर येत नाही. रेग्युलर चेकअप केल्यावर यासारख्या आजारांची माहिती अगदी तात्काळ होते. त्यामुळे दर महिन्याने चेकअप करण अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे आपण काय खातोय यावर थायरॉईड रूग्णाने अधिक काळजी घेतली पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1) फायबरयुक्त भाज्या खावू नये : जर तुम्ही थायरॉईडचे रूग्ण असाल तर तुम्ही कोबी, ब्रोकोली आणि पालक सारख्या भाज्या खावू नयेत. या तिन्ही भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. या भाज्यांमुळे थायरॉईड हार्मोंसचे स्त्राव सर्वाधिक असतात. खास करून ज्या लोकांमध्ये आयोडीनचे प्रमाण अधिक आहे अशा लोकांनी या भाज्या मुळीच खावू नयेत. 



2) सोयाबीन खावू नये : सोयायुक्त पदार्थांमध्ये फयटोएस्ट्रोजन असते. जे थायरॉईल हार्मोंस निर्माण करणाऱ्या एंजाइमच्या कार्यप्रणालीला प्रभावित करत असतात. आणि हेच कारण आहे की, थायरॉईड असलेल्या व्यक्तींनी सोयाबीन अजिबात खावू नये. रिसर्चमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, ज्या महिला सोयाबीनच अधिक सेवन करतात त्यांना हायपोथाइराडिज्म विकसित होण्याची शक्यता तीन टक्क्यांनी वाढते. 



3) प्रोसेस्ड फूड : जर तुम्ही थायरॉईडचे रूग्ण असाल तर तुम्ही प्रोसेस्ड फूड अजिबात खावू नका. यामध्ये सोडियमचे प्रमाण सर्वाधिक असते. सोडियम हायपोथाइरायडिज्म आणि थायरॉईडची कमतरता असलेल्या रूग्णांसाठी हे हानिकारक आहे. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तर तुम्ही 1.5 ग्रॅमहून अधिक सोडियम खावू नये. ते तुमच्यासाठी हानिकारक असते. 



4) सारखेचे प्रमाण कमी असावे : थायरॉईड असणाऱ्यांनी सर्वाधिक साखर खाणं टाळलं पाहिजे. साखर तुमच्या पाचनशक्तीला त्रास देते. यामुळे वजन वाढण्यासारख्या गोष्टी बळावतात. म्हणून थायरॉईड असणाऱ्या व्यक्ती सर्वाधिक कॅलरी आणि शुगर असलेले पदार्थ खावू नयेत. 



5) मद्य आणि कफीन : थायरॉईडची समस्या असणाऱ्यांनी मद्य आणि कफीन याचे सेवन करण पूर्णपणे बंद केलं पाहिजे. कारण थायरॉईड ग्रंथी आणि थायरॉईडच्या स्तरावर या दोघांचा परिणाम होत असतो. या दोन्ही गोष्टी थायरॉईडला हानिकारक आहे. 



6) रेड मीट : सेचुरेटेड फॅट आणि कॉलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी रेड मीटमध्ये सर्वाधिक असते. यामध्ये फॅटच प्रमाण अधिक असतं. सोबतच रेड मीटमुळे शरीरात जळजळ होण्याची शक्यता असते.