मुंबई : आजकाल अनेकांना थायरॉईडची समस्या होत असल्याचं समोर येतं. थायरॉईडमध्ये वजन वाढण्याससह किंवा कमी होण्यासह हार्मोन्सचं असंतुलनही होतं. एका अभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचा आजार होण्याचं प्रमाण दहा पटींनी अधिक असल्याचं सांगितलं आहे. थायरॉईडमध्ये हार्मोन्सचा बॅलेन्स बिघडल्यामुळे ही समस्या होते. हायपरथायरॉडिज्ममध्ये वजन कमी होणं, गरमी सहन न होणं, नीट झोप न येणं, तहान लागणं, अधिक घाम येणं, हात थरथरणं, हृदयाचे ठोके वाढणं, थकवा, चिंता, अनिद्रा अशी समस्या होतात. मात्र आहारात काही गोष्टी टाळल्यास थायरॉईडची समस्या काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोबी, फ्लॉवर


कोबी, फ्लॉवरमध्ये guitornoids नावाचं तत्व अधिक प्रमाणात आढळतं. त्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. त्यामुळे थायरॉईड असलेल्या लोकांनी या दोन भाज्या खाणं टाळावं


सोयाबीन 


सोयबीन अनेक जण भाजीच्या रुपात खातात. सोयाबीनचं तेलही अनेक जण आहारात वापरतात. परंतु सोयाबीनमध्ये guitornoids असतं, जे थायरॉईडचा आजार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. सोयाबीन अधिक प्रमाणात खाल्यास शरीरात थायरोक्सिन वाढतं. थायरोक्सिन वाढल्याने थायरॉईडची समस्याही अधिक वाढते. 


मीठ 


थायरॉईडच्या ग्रंथी मीठाचा वापर करुन थायरोक्सिन हार्मोन्स बनवतात. त्यामुळे शरीरात आयोडिनची कमतरता झाल्यास, थायरॉईडच्या ग्रंथी वाढू लागतात. त्यामुळे आयोडिन मीठ मर्यादेत खाण्याचा सल्ला दिला जातो. सैंधव मीठाचा आहारात वापर करु शकतात.