मुंबई : काम करताना किंवा अपाघातानेही चाटका बसला तर सहाजिकच पाहिला उपचार हा घरगुतीच केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातील किंवा नैसर्गिक उपाय करताना मात्र चूक झाल्यास लहानशी जखमदेखिल गंभीर स्वरूप घेऊ शकते. म्हणूनच हे ५ घरगुती उपाय मूळीच करू नका 


हळद -  एखादी चिर किंवा कट असल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी हळद मदत करते. मात्र हळदीचा वापर कोणत्याही बर्नवर / चटका बसल्यास करू नका. यामुळे त्रास अधिक वाढण्याचा धोका असतो. 


बर्फ - बर्न/ चटका लागल्यास बर्फ थेट वापरू नका. आधी जखम वाहत्या पाण्याखाली धरावी. नंतर बर्फ लावा. अन्यथा त्वचेतील टिश्युचे नुकसान होते. आईस पॅक वापरणे देखील टाळा. 


माती - लहान मुलं किंवा काही पालकही थंडावा निर्माण होण्यासाठी जळलेया / चटका बसलेल्या भागावर माती लावतात. असे केल्यास मातीतील जंतू त्वचेचे नुकसान करतात. 


तेल - चटका बसल्यानंतर काही वेळाने खाज येते. खाज टाळण्यासाठी तेलाचा वापर करणं टाळा. यामुळे नुकसान होते. इंफेक्शनचा धोका वाढतो. 


टुथपेस्ट - शू बाईट्चा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी कदाचित टूथपेस्ट मदत करू शकते मात्र बर्न / चटक्याच्या वेदना कमी करण्यासाठी टुथपेस्ट वापरू नका