मुंबई : नाती खूप नाजूक असतात. ती सांभाळणे फार कठीण कारण ती तुटायला जराही वेळ लागत नाही. प्रेमाचे खतपाणी नात्यातील ओलावा कायम ठेवते. प्रेमाच्या सुरुवातील त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यासाठी तयार असणाऱ्यांनी ती व्यक्ती आयुष्यात आल्यानंतरही तितकीच कदर करणे गरजेचे आहे. कारण नात्याच्या सुरुवातीला होणाऱ्या या चुकांमुळे पार्टनर त्रासला जातो. पाहुया मुलांच्या कोणत्या सवयी मुलींना इरिटेट करतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


# मुलींना नटायला खूप आवडते, हे सर्वश्रुत आहे. तसंच त्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. मात्र मुलांना तयार व्हायला अधिक वेळ लागणे, मुलींना पसंद पडत नाही. मुलींना रफ टफ मुलं आवडतात.


# रिलेशनशिपच्या सुरुवातीला इम्प्रेस करण्यासाठी अनेकदा खोटे बोलले जाते. पण खोटे हे खोटेच असते. पण एकत्र राहिला लागल्यानंतर या गोष्टीचा उलघडा पार्टनरसमोर होतो तेव्हा तिला वाईट वाटते, ती दुखावली जाते आणि विश्वास डगमगीत होतो. धोका दिल्यासारखे वाटू लागते. कदाचित नाते संपुष्टातही येऊ शकते. म्हणून तुम्ही जसे आहात तसेच मुलीसमोर प्रेसेंट व्हा. विनाकारण खोट्याचा आधार घेऊ नका.


# मुलींना मस्त बॉडी असलेली मुले आवडतात. याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना तुमची बॉडी किती जबरदस्त आहे, याची जाणीव करुन द्याल. कारण तुमच्या बॉडी करेल ती स्वतःहुन लक्ष देईल. त्यामुळे बॉडी दाखवण्यापेक्षा तिची स्तुती करा आणि ती स्पेशल असल्याची जाणीव तिला करुन द्या. तुमच्या मनातील भावना तिच्यासमोर व्यक्त करा. याशिवाय तिच्या मनात तुमचे स्थान निर्माण होणार नाही.