मुंबई : आजकाल केसगळतीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे. बदललेली जीवनशैली, अवेळी खाणे, जंक फूड, व्यसन, ताण तणाव, केसांची योग्य काळजी न घेणे या सगळ्यामुळे केसगळतीची समस्या उद्भवते. पण आयुर्वेदात आपल्याला यावर प्रभावी आणि सोपे उपाय सापडतात. आयुर्वेदातील ५ सोपे उपाय ज्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होईल. पाहुया कोणते आहेत ते उपाय...


भृंगराज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मजबूत आणि घनदाट केसांसाठी आयुर्वेदात भृंगराजला अत्यंत महत्त्व आहे. भृंगराज तेलामुळे केसगळती कमी होण्याबरोबरच केस पांढरे होण्याची समस्याही दूर होते.


ब्राह्मी


ब्राह्मी आणि दह्याचा पॅक बनवून केसांना लावा. केस गळणे कमी होईल. ब्राह्मीच्या तेलाने नियमित मसाज केल्याने केस घनदाट होतात.


आवळा


आवळ्यात व्हिटॉमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केसगळती कमी होवून केस वाढण्यास मदत होते. आवळ्यात हिना, ब्राह्मी पावडर आणि दही घालून पॅक बनवा आणि केसांना लावा. यामुळेही नक्कीच फायदा होईल.


कडूलिंब


कडूलिंबामुळे कोंडा, उवा या समस्याही दूर होतात. नीम पावडर, दही किंवा खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात.


रिठा


केसांना काळेभोर आणि घनदाट बनवण्यासाठी रिठा अतिशय उपयुक्त ठरते. रिठा पावडर तेलात मिसळून डोक्याला लावल्याने केस गळणे कमी होते.