वजन कमी होण्याचं नाव घेत नाही? बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या उपायामुळे मेणासारखी वितळेल हट्टी चरबी
Baba Ramdev Weight Loss Tips : लठ्ठपणा हा सगळ्या आजारांच मूळ मानलं जातं. असं असताना अनेकदा प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही. अशावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले काही खास उपाय
Weight Loss : अनेकदा वजन कमी करणं हा एक मोठा टाक्स बनून जातो. कारण कितीही केलं तर पोट, मांडीवरची घट्ट हट्टी चरबी कमी व्हायचं नाव घेत नाही. या लठ्ठपणामुळे डायबिटिज, कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक आणि इन्फर्टिलिटी सारख्या समस्या निर्माण होतात. यावर बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत. कारण अनेकदा वेगवेगळे डाएट किंवा औषधे वजन कमी करण्यास घेतले जातात. पण त्याचा फार तसा फायदा होत नाही. अशावेळी आयुर्वेदिक पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास आरोग्याला नक्कीच फायदा होतो.
बाबा रामदेव यांचे उपाय
दालचिनी टाकून गरम पाणी
जर आपण नियमितपणे गरम पाण्यात मर्यादित प्रमाणात दालचिनी उकळून त्यात 1 चमचा मध मिसळून प्यायलो तर आपले वजन कमी होऊ शकते. तसेच रात्री 1 चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घेतल्याने वजन नियंत्रणात राहते. हा उपाय बाबा रामदेव सांगतात. दालचिनी फोट साफ ठेवण्यास मदत करण्यासही मदत करतात. कोमट पाणी ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होतात.
लिंबू पाणी
बाबा रामदेव यांच्या मते, सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू बाहेर पडते आणि वजन कमी होऊ लागते. शरीरातील चरबी जाळण्यासाठी हा एक चांगला आयुर्वेदिक उपचार आहे. हे शरीर पूर्णपणे डिटॉक्स करते. लिंबू पाणी हे अतिशय फायदेशीर आहे.
जेवणाअगोदर सलाड खा
बाबा रामदेव यांनी सांगितल्यानुसार, जेवणा अगोदर सलाड खा. यामागे दोन कारणे आहेत. सलाड खाल्ल्यामुळे तुम्ही इतर आहार कमी खाता. एवढंच नव्हे तर सालडमध्ये असलेले प्रोटीन, फायबर मुबलक प्रमाणात मिळते. त्यामळे शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो सारख्या पदार्थांचा समावेश करा.
रात्री हे खाऊ नका
बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या उपायांपैकी दोन उपाय रात्रीच्या जेवणात करायचे आहेत. योगगुरु म्हणतात की, रात्रीच्या जेवणात चपाती-भात खाणे. चपाती आणि भात रात्रीचा आहारात घेतल्याने एक जडपणा पाहायला मिळतो. रात्री उशिरा जेवण घेतल्याने शरीराला पचनास त्रास होतो. रात्रीचा आहार हा कायमच हलका असावा.
डिनर 7 च्या अगोदर
बाबा रामदेव म्हणतात की, डिनर रात्री 7 च्या अगोदर करा. आपल्यापैंकी अनेकजण रात्री उशिरा जेवतो आणि काही वेळातच झोपतो. आणि यामुळे अन्नपचन होत नाही. अशावेळी डिनर तुम्ही 7 च्या अगोदर करून घेतलं तर नक्कीच फायदा होतो. रात्री जेवण 7 च्या अगोदर केल्यास वजन कमी होण्यासही मदत होतो.