Back Or Lower Back Pain : कंबर दुखी किंवा पाठी दुखी या त्रासानं आज अनेक लोक त्रस्त आहेत. आधी या सगळ्या समस्या आधी वयाच्या 40 व्या वर्षी सुरु असायच्या पण आता त्याला काही वयाचा नियम नाही. अनेक तरुणांना ही समस्या होते. तर एका संशोधनानुसार ही गोष्ट समोर आली आहे की या  समस्या पुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्ये होतात. बदलतं जीवन आणि असंतुलित आहार यामुळे अनेक महिलांना हा त्रास होतो. स्त्रियांमध्ये, ही समस्या मासिक पाळी किंवा मग गर्भधारणेदरम्यान सर्वात सामान्य आहे. याशिवाय महिलांमध्ये पाठदुखीच्या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. पाठदुखीची समस्या टाळण्यासाठी बहुतेक महिला सर्व प्रकारच्या औषधांचे सेवन करतात, परंतु तरीही त्यांना या समस्येपासून पूर्ण आराम मिळत नाही. आज आपण पाठ किंवा कंबर दुखीची कारण जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लठ्ठपणा


लठ्ठपणामुळे देखील पाठदुखीचे कारण आहे. अनेक महिलांना त्यांच्या वाढत्या वजनामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे स्वत: निरोगी ठेवण्यासाठी सतत व्यायाम करा आणि वजनावर नियंत्रण मिळवा. त्यासोबत बसताना पाठीचा कणा हा सरळ ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम घेण्यास सुरुवात करा. 


आळशीपणा
जे लोक सतत बसून असताता त्यांना पाठदुखीच्या समस्या कमी वयातही उद्भवतात. तर गृहीणी या काही काळानंतर कंटाळतात किंवा कामात इतक्या व्यस्त होतात की व्यायाम करणं विसरतात. अशा परिस्थितीत त्यांना ही समस्या खूप त्रास देऊ शकते. त्यांच्या स्वत: कडे लक्ष न देण्याच्या सवयीमुळे त्यांचे वजन वाढते, पोटाच्या समस्या उद्भवतात, हार्मोनल बदल, वाढते स्ट्रेस, झोप न येणे अशा अनेक समस्या होऊ शकतात.  


हेही वाचा : Raghav Chadha यांचा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर'


गर्भधारणा


गरोदरपणात महिलांना अनेकदा पाठदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. गरोदरपणात पाठदुखीच्या समस्येमध्ये सर्वात जास्त वेदना कंबरेच्या खाली आणि माकड हाडाजवळ होते. गरोदरपणाच्या 5 व्या महिन्यानंतर पाठदुखीचा त्रास वाढतो आणि त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.


पाठदुखीची समस्येपासून सुटका हवी असेल तर करा 'या' गोष्टी


पाठदुखीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर व्यायाम करण्यास सुरुवात करा. त्यात तुम्ही एरोबिक्स, स्ट्रेचिंगच्या एक्सर्साईज यासारख्या वेगळ्या प्रकारच्या व्यायामामुळे पाठदुखी सारख्या समस्यांना पासून सुटका मिळवू शकता. आठवड्यातून किमान 3 ते 5 वेळा व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये पाठदुखीचा धोका सर्वात कमी असल्याचे अलीकडील संशोधनातून दिसून आले आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)